नागपूर : भारतीय संविधानाच्या अमृतमहोत्सवी वर्षानिमित्त विवेक विचार मंचाच्या वतीने राज्यभर सामाजिक संवाद मेळाव्यांचे अयोजन करण्यात येत आहे, त्याच अंतर्गत नागपुरात सामाजिक संवाद मेळावा आयोजित करण्यात आला.
या वेळी बोलताना ऍडव्होकेट संदीप जाधव यांनी भाजप संविधान बदलणार असल्याचा अपप्रचार हा काँग्रेसचे नियोजनबद्ध देशविघातक षड्यंत्र असल्याचा त्यांनी सांगितले.भाजप संविधान बदलणार असल्याचा अपप्रचार समाजात भीती पसरवण्यासाठी जाणीवपूर्वक केला जात आहे. “हा अपप्रचार काँग्रेसचे देशविघातक षड्यंत्र असून, समाजात तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न आहे,” असे मत त्यांनी व्यक्त केले. सर्व घटकांनी संविधानाच्या रक्षणासाठी एकत्र येण्याचे आवाहनही त्यांनी केले.
विवेक विचार मंचाचे राज्य कार्यवाह महेश पोहनेरकर यांनी यावेळी उपस्थितांशी संवाद करतानी संविधानाचे महत्त्व अधोरेखित केले. “भारतीय संविधान हे केवळ वचननामा नसून एक राष्ट्रीय ग्रंथ आहे जो समता आणि शोषणमुक्त समाजाच्या उभारणीचा आदर्श मांडतो,” असे त्यांनी प्रतिपादन केले.
या मेळाव्याचे आध्यक्ष ज्येष्ठ कायदेतज्ज्ञ अविनाश काळे यांनी भारतीय संविधानातील स्वातंत्र्य, समता, बंधुता आणि एकात्मता या मूल्यांवर भर दिला. “संविधानाचे रक्षण ही फक्त कायदेशीर जबाबदारी नसून सामाजिक कर्तव्यदेखील आहे,” असे सांगत त्यांनी सर्वांनी जागरूक राहून संविधानावर येणाऱ्या कोणत्याही आघाताला रोखण्याचे आवाह केले.
या मेळाव्याचे प्रास्ताविक सुनील किटकरु यांनी केले, महानगर संयोजक अतुल बावणे यांनी संविधानाच्या प्रास्ताविकेचे वाचन केले,यावेळी श्री.मनिष मेश्राम,विदर्भ प्रांत संयोजक श्री. अतुल शेंडे, प्रशांत मुन, श्री.सुरेश विंचुरकर व राज्य अनुसूचित जाती/जमाती अयोगाचे उपाध्यक्ष श्री. धम्मपाल मेश्राम यांची उपस्थिती होती.