Abdul Kalam Birth Anniversary : आज देशाचे माजी राष्ट्रपती एपीजे अब्दुल कलाम (Abdul Kalam) म्हणजेच मिसाइल मॅन म्हणून प्रसिद्ध असलेले अबुल पाकीर जैनुला अब्दुल कलाम यांची ९१ वी जयंती आहे. एपीजे अब्दुल कलाम यांच्या जयंतीनिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांनी X वर एक व्हिडिओ पोस्ट करून त्यांना श्रद्धांजली वाहिली आहे.
व्हिडिओसोबत पंतप्रधान मोदींनी कॅप्शनमध्ये लिहिले की, ‘प्रसिद्ध शास्त्रज्ञ आणि माजी राष्ट्रपती डॉ. एपीजे अब्दुल कलाम जी यांना त्यांच्या जयंतीनिमित्त विनम्र श्रद्धांजली. त्यांची दूरदृष्टी आणि विचार देशाला विकसित भारताचा संकल्प साध्य करण्यासाठी खूप उपयोगी ठरणार आहे.’ अशा आशयाची पोस्ट मोदींनी आपल्या सोशल मीडिया अकाउंटवर केली आहे.
माजी राष्ट्रपती एपीजे अब्दुल कलाम यांच्या जयंतीनिमित्त शाळा आणि महाविद्यालयांमध्ये वेगवेगळे कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहेत. एपीजे अब्दुल कलाम हे केवळ भारताचे राष्ट्रपतीच नाही तर त्यांना मिसाईल मॅन आणि देशातील महान वैज्ञानिक म्हणूनही ओळखले जातात ज्यांचे देशासाठी मोठे योगदान आहे.
सुप्रसिद्ध वैज्ञानिक और पूर्व राष्ट्रपति डॉ. एपीजे अब्दुल कलाम जी को उनकी जयंती पर आदरपूर्ण श्रद्धांजलि। उनका विजन और चिंतन विकसित भारत के संकल्प की सिद्धि में देश के बहुत काम आने वाला है। pic.twitter.com/g36gwh94Y9
— Narendra Modi (@narendramodi) October 15, 2024
माजी राष्ट्रपती एपीजे अब्दुल कलाम यांचे पूर्ण नाव अवुल पाकीर जैनुलब्दीन अब्दुल कलाम आहे. ते भारताचे 11 वे राष्ट्रपती होते. त्यांचा जन्म 15 ऑक्टोबर 1931 रोजी तामिळनाडूच्या रामेश्वरम तीर्थक्षेत्रात, नंतर मद्रास प्रेसिडेन्सी आणि आता तामिळनाडू राज्यात एका तमिळ मुस्लिम कुटुंबात झाला. कलाम यांनी भारतीय अंतराळ आणि लष्करी संशोधनाच्या प्रगतीसाठी महत्त्वपूर्ण योगदान दिले आहे. तसेच ते इतिहासातील महान शिक्षकांपैकी एक आहेत.
पुढे पंतप्रधान मोदी म्हणाले, ‘अब्दुल कलाम यांच्या आशीर्वादाने आम्ही त्यांच्या शिकवणीने ठरवलेली उद्दिष्टे साध्य करण्यासाठी प्रयत्नशील राहू. हीच त्यांना सर्वात मोठी श्रद्धांजली असेल.’