Maharashtra Assembly Elections : महाराष्ट्र-झारखंड विधानसभा निवडणुकीच्या तारखांबाबत लवकरच घोषणा केली जाणार आहे. आज (मंगळवारी) भारतीय निवडणूक आयोग ३.३० वाजता पत्रकार परिषद घेत दोन्ही राज्यांचे विधानसभा निवडणुकीचे वेळापत्रक जाहीर करणार आहे. पण त्यापूर्वीच मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार यांनी ईव्हीएमबाबत महत्वाचे विधान केले आहे.
विरोधी पक्षांकडून सातत्याने ईव्हीएमवर प्रश्न उपस्थित केले जात आहेत. विरोधकांनी उपस्थित केलेल्या प्रश्नांना उत्तर देताना राजीव कुमार म्हणाले, “जनता मतदानात सहभागी होऊन प्रश्नांची उत्तरे देतात. ईव्हीएमचा प्रश्न आहे तो 100 टक्के निर्दोष आहेत.”
#WATCH | Delhi: On questions being raised by opposition parties over EVMs, Chief Election Commissioner, Rajiv Kumar says "The public answers the questions by participating in the voting. As far as the EVMs are concerned, they are 100% foolproof…" pic.twitter.com/CAkARkw15m
— ANI (@ANI) October 15, 2024
ते पुढे म्हणाले, ‘मतदानात सक्रीय सहभागी होत लोकांकडून याचे उत्तर दिले जाते. ईव्हीएम हे शंभर टक्के फुलप्रुफ असल्याचे आम्ही यापूर्वीही अनेकदा सांगितले आहे. याबाबत पुन्हा प्रश्न उपस्थित झाल्यास आम्ही पुन्हा यासंदर्भात सांगू, असे राजीव कुमार यांनी स्पष्ट केले.’ एनआयशी बोलताना राजीव कुमार यांनी ईव्हीएमवर प्रश्न उपस्थित करणाऱ्यांना सुनावले आहे.
हरियाणा विधानसभा निवडणुकीत काँग्रेसचा पराभव झाल्यापासून पक्षाचे वरिष्ठ नेते ईव्हीएमवर सातत्याने प्रश्न उपस्थित करत आहेत. निकालानंतर काँग्रेसच्या नेत्यांनी ईव्हीएममधील त्रुटी असल्याचे सांगितले. याप्रकरणी त्यांनी बॅटरीवर देखील प्रश्न उपस्थित करत तक्रारी केल्या होत्या. काँग्रेसला कमी मते मिळालेल्या काही ईव्हीएम मशीनमध्ये छेडछाड झाल्याचा गंभीर आरोप करत निवडणूक आयोगाकडे याबाबत अधिकृत तक्रारीही केल्या आहेत. यापार्श्वभूमीवर राजीव कुमार यांचे आजचे विधान महत्वाचे मानले जात आहे.