Maharashtra Assembly Elections Dates : महाराष्ट्रात विधानसभेच्या (Maharashtra Assembly Elections) 288 जागांसाठी निवडणुकीचे बिगूल वाजले आहे. निवडणूक आयोगाने पत्रकार परिषद घेत महाराहाष्ट्रातील विधानसभा निवडणुकीच्या तारखेची घोषणा केली आहे. महाराष्ट्र राज्यात एकाच टप्प्यात निवडणुका होणार असून 20 नोव्हेंबर रोजी मतदान होणार आहे तर 23 नोव्हेंबर रोजी मतमोजणी होणार आहे. अशा परिस्थितीत आता राज्यात आचारसंहिता लागू झाली आहे.
महाष्ट्रातील सध्याच्या राजकीय समीकरणाबाबत बोलायचे झाले तर, महायुती आणि महाविकास आघाडीमध्ये चुरशीची लढत पाहायला मिळणार आहे. सध्या राज्यात शिवसेना आणि राष्ट्रवादीत पक्षफुटीमुळे दोन गट निर्माण झाले आहेत. याचा लोकसभा निवडणुकीवर मोठा परिणाम दिसून आला. त्याचप्रमाणे विधानसभा निवडणुकांमध्ये देखील याचा परिणाम दिसून येणार असल्याचे बोलले जात आहे.
२६ नोव्हेंबरला राज्यातील विधानसभेचा कार्यकाळ संपत असून, त्याआधी नवे सरकार सत्तेत येईल, असे केंद्रीय निवडणूक आयोगाने आधीच जाहीर केले होते. राज्यात महाविकास आघाडी आणि महायुतीमधून कोणाचे सरकार स्थापन होणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. दरम्यान, हरियाणात मिळालेल्या एकहाती विजयामुळे भाजप महाराष्ट्रातही सरकार स्थापन करेल असे बोलले जात आहे. महायुती सरकार पुन्हा सत्तेत येईल अशा विश्वास भाजपकडून व्यक्त केला जात आहे.
राज्यात ९ कोटी ६३ लाख मतदार
दरम्यान, महाराष्ट्रात एकूण ९ कोटी ६३ लाख मतदार असल्याचे निवडणूक आयोगाने सांगितले आहे. तसेच महारष्ट्रात एकूण १,००,१८६ पोलिंग स्टेशन असणार आहेत. तसेच ८५ वयाच्या वरील ज्येष्ठ नागरिक लोकांना घरून मतदान करण्याचा देखील अधिकार असणार आहे.