Maharashtra Assembly Elections Dates : महाराष्ट्रात विधानसभेच्या (Maharashtra Assembly Elections) 288 जागांसाठी निवडणुकीच्या तारखा जाहीर झाल्या आहेत. निवडणूक आयोगाने आज (मंगळवारी) पत्रकार परिषद घेत महाराहाष्ट्रातील विधानसभा निवडणुकीच्या तारखेची घोषणा केली आहे. महाराष्ट्र राज्यात एकाच टप्प्यात निवडणुका होणार असून 20 नोव्हेंबर रोजी मतदान होणार आहे तर 23 नोव्हेंबर रोजी मतमोजणी होणार आहे. अशा परिस्थितीत आता राज्यात आचारसंहिता लागू झाली आहे. निवडणूक आयोगाच्या घोषणेनंतर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी X वर पोस्ट करत दिवाळीत प्रकाश पर्व असेल! असे लिहिले आहे.
महाराष्ट्रात निवडणुकीच्या तारखा जाहीर झाल्यानंतर देवेंद्र फडणवीस यांनी ट्विटरवर पोस्ट शेअर करत लिहिले, ‘लोकशाहीतील सर्वोच्च महोत्सवाची आज घोषणा झाली. दिवाळीत प्रकाश पर्व असेल ! आणि पाठोपाठ दुसरे विकासाचे प्रकाशपर्व आपण 20 नोव्हेंबरला एकत्र साजरे करू! भाजपाच्या नेतृत्वात आपण 2014, 2019 ला भरभरून यश दिले, संपूर्ण बहुमत दिले. चला पुन्हा सारे मिळून सोबत येऊ या, आणि 23 नोव्हेंबरला महायुतीच्या विजयाचा जल्लोष करू या! या लोकउत्सवात आपणही सारे मोठ्या संख्येने सहभागी व्हा! विकासासाठी महाराष्ट्र तुमच्या आशिर्वादाची आणि भक्कम जनादेशाची वाट बघतोय…’
लोकशाहीतील सर्वोच्च महोत्सवाची आज घोषणा झाली.
दिवाळीत प्रकाश पर्व असेल !
आणि पाठोपाठ दुसरे विकासाचे प्रकाशपर्व आपण 20 नोव्हेंबरला एकत्र साजरे करू!
भाजपाच्या नेतृत्वात आपण 2014, 2019 ला भरभरून यश दिले, संपूर्ण बहुमत दिले.
चला पुन्हा सारे मिळून सोबत येऊ या,
आणि 23 नोव्हेंबरला… https://t.co/j4nAq2CTMt— Devendra Fadnavis (@Dev_Fadnavis) October 15, 2024
तर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी देखील X वर पोस्ट करत लिहिले, ‘आता निर्णायक क्षण आला आहे’ असे म्हटले आहे. ”मागच्या दोन वर्षांचे आमचे कामं महाराष्ट्राच्या जनतेसमोर ऐतिहासिक अर्थसंकल्प, विकासाची नवी उंची, लाडकी बहीण योजना, तीन मोफत गॅस सिलिंडर आणि शेतकऱ्यांसाठी वीज बिल माफी या आणि अश्या अनेक लोकोपयोगी योजनांच्या आणि निर्णयांच्या माध्यमातून उभे आहे. राष्ट्रवादी काँग्रेसमधील प्रत्येक सहकाऱ्याने या योजना प्रत्येक घरोघरी पोहोचवण्यासाठी अथक परिश्रम घेतले आहेत. आता निर्णायक क्षण आला आहे. छत्रपती शिवाजी महाराज, राजर्षी शाहू महाराज, महात्मा फुले, मौलाना आझाद आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारांनी प्रेरित, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष समाजातील प्रत्येक घटकाच्या उत्थानासाठी कटिबद्ध आहे. आपण पुढे येऊन महाराष्ट्राच्या उज्ज्वल भविष्यासाठी एकत्र लढूया आणि समृद्ध महाराष्ट्र घडवूया.”
मागच्या दोन वर्षांचे आमचे कामं महाराष्ट्राच्या जनतेसमोर ऐतिहासिक अर्थसंकल्प, विकासाची नवी उंची, लाडकी बहीण योजना, तीन मोफत गॅस सिलिंडर आणि शेतकऱ्यांसाठी वीज बिल माफी या आणि अश्या अनेक लोकोपयोगी योजनांच्या आणि निर्णयांच्या माध्यमातून उभे आहे. राष्ट्रवादी काँग्रेसमधील प्रत्येक… pic.twitter.com/xRD2s1gcia
— Ajit Pawar (@AjitPawarSpeaks) October 15, 2024
महाराष्ट्रातील निवडणुकीची अधिसूचना २२ ऑक्टोबर रोजी सादर केली जाईल. उमेदवारांना अर्ज दाखल करण्यासाठी २९ ऑक्टोबर ही शेवटची तारीख असेल. तर ३० ऑक्टोबरला अर्जांची छाननी होईल. उमेदवारांना अर्ज मागे घेण्यासाठी ४ नोव्हेंबर पर्यंत वेळ असेल.