परभणी : डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे संविधान बदलले जाणार असल्याचा काँग्रेस आणि कम्युनिस्टांनी शोध लावला आहे. भ्रामक कल्पना जनमाणसात पसरवणे हाच काँग्रेसचा मुळ धंदा आहे. डाॅ. बाबासाहेब आंबेडकर यांनी लिहलेले संविधान जगात सर्वश्रेष्ठ आहे. कुणी कितीही प्रयत्न केले तरी भारतीय संविधानाच्या मुलभुत गाभ्याला धक्का लावता येत नाही. संविधान व आरक्षण यावर काँग्रेसने अनेक वेळा अघात केलेला आहे असे मत जेष्ठ संविधान अभ्यासक वाल्मिक निकाळजे यांनी सामाजिक संवाद मेळाव्यातून व्यक्त केले.
विवेक विचार मंचाच्या वतीने हॉटेल रायबा सभागृह, परभणी येथे सामाजिक संवाद मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी व्यासपीठावर जेष्ठ नेते राधोजी शेळके, विवेक विचार मंचाचे प्रांत समन्वयक अरुण कराड यांची उपस्थिती होती.
काॅग्रेसने बाबासाहेबांना मुंबईतुन पराभुत केले. कॉँग्रेसने ४२ व्या घटना दुरूस्ती करून आणीबाणीच्या माध्यमातून संविधानाचा गळा घोटण्याचे काम केले. आरक्षणाला पहिला विरोध नेहरु व काँग्रेसने केला होता. याच आरक्षण मुद्दावर बाबासाहेब आंबेडकर संविधान सभेचा राजिनामा देणार होते. भारतीय संविधानातील मुलभूत अधिकारांत कुठलाही बदल करता येत नाही. मुलभूत अधिकारांमध्ये संसद, राष्ट्रपती , सर्वोच्च न्यायालय बदल करु शकत नाहीत. याचाच अर्थ संविधान बदलले जाऊ शकत नाही.काँग्रेसने हिंदुकोड बिलाच्या मुद्दावर बाबासाहेबांना मंत्रिपदाचा राजीनामा द्यायला भाग पाडले होते.
मुस्लिमांना शरिया कायदा पाहिजे,आणि याच मुस्लिमांचा काँग्रेसला पुळका आहे. कम्युनिस्टांना हिंसेवर आधारित राज्य पाहिजे. आणि आहे रे आणि नाही रे वर्गात संघर्ष निर्माण करायचा आहे.
यावेळी मंचावर उपस्थित असलेले अरुण कराड म्हणाले की,भारतीय संविधान भारतीय नागरिकांचा रक्षणाकर्ता आहे. जनमाणसाच्या अधिकार कक्षा रुंदवण्याच काम भारतीय संविधानातील मुलभूत अधिकारामुळे शक्य झाले. 75 वर्षात भारतीय सर्वसामान्य समाज संवैधानिक व्यवस्थेमुळे आर्थिक आणि सामाजिक दृष्ट्या समृद्ध होत आहे.
काॅग्रेस कडुन संविधान बदलले जाणार, हुकुमशाही येणार असे फेक नरेटीव्ह पसरवून जनमाणसात संविधानाविषयी नकारात्मक गोष्टी पसरवण्यात येत आहेत. संविधानाविषयी नागरिकांचा विश्वास कमी करण्याचे षडयंत्र काँग्रेस करत आहेत.याविरोधात समाजाला जागृत करण्याची आवश्यकता आहे.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री.सचिन रासवे यांनी केले. आभार प्रदर्शन प्रा. रमेश शेळके यांनी केले. यावेळी ऋषिकेश सकनुर, शिवाजी शेळके, नागसेन पुंडगे, प्रा.रमा शेजवळ व जिल्हयातील सामाजिक कार्यकर्त्यांची उपस्थित होती.