Devendra Fadnavis : महाराष्ट्रात विधानसभा (Maharashtra Assembly Election 2024) निवडणुकांचे बिगुल वाजले असून, मंगळवारी दुपारी निवडणूक आयोगाने पत्रकार परिषद घेत महाराष्ट्र आणि झारखंड विधानसभा निवडणुकीच्या तारखा जाहीर केल्या आहेत. येत्या 20 नोव्हेंबरला महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकीसाठी मतदान पार पडेल. तर 23 नोव्हेंबरला निकाल जाहीर होणार आहे. राज्यात विधानसभा निवडणुकीच्या तारखांची घोषणा होताच महायुतीची आज पत्रकार परिषद पार पडली.
आजच्या पत्रकार परिषदेत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार आणि देवेंद्र फडणवीस उपस्थित होते. यावेळी महायुती सरकारने गेल्या अडीच वर्षांच्या कामाचा आढावा दिला. त्यासोबतच अनेक मुद्द्यांवर चर्चा झाली. तसेच राज्यातील सर्वात चर्चेत असलेली लाडकी बहीण योजना पुढे पण चालत राहील अशी ग्वाही दिली.
आजच्या पत्रकार परिषदेत देवेंद्र फडणवीसांनी विरोधकांवर देखील निशाणा साधला. एका पत्रकाराने विचारलेल्या एका प्रश्नावर फडणवीस आक्रमक झालेले दिसले आणि त्यांनी थेट शरद पवारांनाच आव्हान दिले.
पत्रकार परिषद सुरू झाल्यावर अजित पवार, देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे यांनी विरोधकांवर निशाणा साधला. त्यासोबतच सरकारने केलेल्या योजनांसह कामाची माहिती दिली. त्यानंतर पत्रकारांनी प्रश्न विचारायला सुरुवात केली. त्यावेळी एका पत्रकाराने शरद पवार म्हणालेत की, महायुतीने उमेदवाराचा चेहरा जाहीर करावा? यावर फडणवीसांनी लगेच उत्तर देत म्हंटले, सत्तापक्षाला चिंता नाही, मुख्यमंत्री इथे बसलेच आहेत. मी शरद पवार यांना आव्हान करतो तुमचा मुख्यमंत्रीपदाचा चेहरा कोण सांगावा. असं चॅलेंज फडणवीसांनी यावेळी शरद पवारांनी दिले आहे.
पुढे जागावाटपावर बोलताना फडणवीस म्हणाले, आमचं जवळपास काम झालं असून जागावाटप अतिम टप्प्यात आहे. बोटावर मोजण्या इतपत जागा बाकी आहेत. साधारपणे कोणत्या पक्षाचा कुठे जोर आहे, कुठे तीन पक्ष एकत्र येऊन कोणता उमेदवार निवडून येऊ शकतो. कोणाकडे चांगला उमेदवार आहे? अशा गोष्टींचा विचार करून आम्ही जागावाटप करत आहोत. जागावाटपाचा फॉर्मुला हा मध्येच सांगता येत नाही, लवकरच आम्ही जागावाटपाबद्दल सांगू, असं देखील फडणवीसांनी यावेळी स्पष्ट केले आहे.