Iran-Israel war : गेल्या महिन्यात बेरूतमध्ये (Beirut) मारला गेलेला आपला वरिष्ठ लष्करी कमांडर ब्रिगेडियर जनरल अब्बास निलफोरोशन याच्या हत्येने इराण अजूनही हादरलेला आहे. त्याच्या हत्येचा बदला इस्रायलकडून घेण्याची शपथ त्यांनी घेतली आहे. अब्बास निलफोरोशन इस्लामिक रिव्हॉल्यूशन गार्ड्स कॉर्प्स (IRGC) मध्ये कमांडर होता.
अब्बास निलफोरोशन याच्या मृत्यूनंतर इराणने इस्रायलला इशारा देत म्हंटले आहे की, ‘आमच्या कमांडरची हत्या करून तुम्ही गुन्हा केला आहे, ज्यासाठी तुम्हाला त्याची भरपाई द्यावी लागेल. इराणच्या परराष्ट्र मंत्रालयाने सांगितले की, ‘ते बदला घेण्यासाठी उपलब्ध सर्व मार्गांचा वापर करतील.’
हिजबुल्लाचा नेता हसन नसराल्लाहला मारण्यासाठी इस्रायलने 27 सप्टेंबर रोजी दक्षिण बेरूतमधील त्यांच्या गुपित ठिकाणांवर हल्ला केला होता. या हल्ल्यात नसराल्लाहसोबत इराणी कमांडर निलफोरोशन देखील मारला गेला होता. दहशतवादी संघटना हिजबुल्लाहला तांत्रिक सहाय्य देण्यासाठी IRGC च्या वतीने त्याला तेथे तैनात करण्यात आले होते.
अशातच आता असे बोलले जात आहे, ‘इराण आपल्या अणुशक्तीचा वापर इस्रायलचा सामना करण्यासाठी वापरू शकते. तज्ज्ञांच्या मते, इस्रायल आणि अमेरिकेला धडा शिकवण्यासाठी इराणने गेल्या 3 वर्षांत अण्वस्त्रे बनवण्यासाठी वेगाने करत आहे.
इंटरनॅशनल ॲटोमिक एनर्जी एजन्सी (IAEA) च्या म्हणण्यानुसार, ‘इराणकडे सध्या इतके युरेनियम आहे की, त्यांना हवे असल्यास ते काही आठवड्यात सुमारे तीन अणुबॉम्ब बनवू शकतात. IAEA अधिकाऱ्यांचा दावा आहे की, इराणचा बॉम्ब विकसित करण्याचा कोणताही हेतू नाही. मात्र, त्यांची वृत्ती काळानुसार बदलू शकते. सध्या विविध प्रकारच्या आर्थिक निर्बंधांमुळे इराण खूपच कमकुवत झाला आहे. अशा स्थितीत इस्रायलला प्रत्युत्तर देण्यासाठी मजबूत विरोधाची गरज आहे.
दरम्यान, इस्रायलच्या पलटवाराला घाबरलेल्या इराणसाठी एक दिलासादायक बातमी आहे. सोमवारी अमेरिकन मीडियामध्ये प्रसिद्ध झालेल्या वृत्तानुसार, इराणने 1 ऑक्टोबरच्या क्षेपणास्त्र हल्ल्याचा बदला म्हणून इस्रायल इराणच्या तेल किंवा आण्विक स्थळांना लक्ष्य करणार नाही, असे आश्वासन इस्रायलने व्हाईट हाऊसला दिले आहे.
वृत्तानुसार इस्रायलने म्हटले आहे की, ते फक्त इराणच्या लष्करी ठिकाणांवरच हल्ला करू शकतात. इस्रायलच्या आश्वासनामुळे इराणसोबतच अमेरिकेनेही सुटकेचा नि:श्वास सोडला आहे. यापूर्वी अमेरिकेचे अध्यक्ष जो बायडेन यांनी इस्रायलच्या या हल्ल्याला विरोध केला होता, तसेच जर इस्रायलन असे केल्यास आम्ही त्यांना साथ देणार नाही असेही म्हंटले होते.