Sameer Wankhede : महाराष्ट्राचे प्रसिद्ध आयआरएस अधिकारी समीर वानखेडे (Sameer Wankhede) आता महाराष्ट्राच्या (Maharashtra) राजकारणात उतरणार आहेत. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, वानखेडे हे एकनाथ शिंदे गटाच्या नेतृत्वाखालील शिवसेनेत प्रवेश करू शकतात. तसेच मुंबईतील धारावी विधानसभा मतदारसंघातून ते निवडणूक लढवू शकतात, असेही सांगण्यात येत आहे. समीर वानखेडे हे 2008 च्या बॅचचे आयआरएस अधिकारी आहेत. 2021 पर्यंत त्यांनी NCB चे झोनल डायरेक्टर म्हणूनही पद भूषवले आहे.
धारावी विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढवू शकतात?
समीर वानखेडे हे बऱ्याच दिवसांपासून चर्चेत असून आता त्यांचा राजकारणातील प्रवेश हा एक मोठा टप्पा मानला जात आहे. धारावी विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढवून ते आपल्या राजकीय प्रवासाला सुरुवात करू शकतात.
सध्या महाराष्ट्रात एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली महायुतीचे सरकार असून त्यात भाजपचाही समावेश आहे. 2019 च्या विधानसभा निवडणुकीनंतर महाराष्ट्राच्या राजकारणात प्रचंड गदारोळ पाहायला मिळाला. त्यानंतर भाजप आणि शिवसेनेने एकत्र निवडणूक लढवली होती. भाजपने 165 जागांवर निवडणूक लढवली आणि 105 जागा जिंकल्या. तर शिवसेनेने 126 जागा लढवून 56 जागा जिंकल्या. महाराष्ट्राच्या राजकारणात आता दोन शिवसेना आणि दोन राष्ट्रवादी आहेत. शिंदे गटाची शिवसेना भाजपसोबत आहे, तर उद्धव ठाकरेंची शिवसेना काँग्रेससोबत आहे. तसेच अजित पवार यांची राष्ट्रवादी भाजपसोबत, तर शरद पवारांची राष्ट्रवादी काँग्रेससोबत युती करत आहे.
महाराष्ट्रात कधी विधानसभा निवडणूक लढवली जाणार?
मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार यांनी पत्रकार परिषद घेत सांगितले की, महाराष्ट्रातील सर्व 288 विधानसभा जागांसाठी एकाच टप्प्यात मतदान होणार आहे. 20 नोव्हेंबर रोजी मतदान होणार आहे तर 23 नोव्हेंबर रोजी मतमोजणी होणार आहे. तसेच महाराष्ट्रात एकूण ९.६३ कोटी मतदार असल्याचे देखील त्यांनी सांगितले.