पुणे, दिनांक १७ ऑक्टोबर ः गुरुग्राम येथील गलगोटिया विद्यापीठात पार पडणाऱ्या राष्ट्रीय संशोधन परिषदेसाठी महाराष्ट्रातील ३४७ शोधनिबंधांची निवड झाली आहे. व्हिजन फॉर विकसित भारत 2024 प्रांत स्तरीय शोधार्थी संमेलनात नुकताच संशोधकांचा सन्मान करण्यात आला.
भारतीय शिक्षण मंडळ पश्चिम महाराष्ट्राच्या वतीने एसएनडीटी महाविद्यालयात या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. 15 ते 17 नोव्हेंबर दरम्यान गलगोटिया विद्यापीठात राष्ट्रीय संशोधन परिषद संपन्न होणार आहे. भारतीय शिक्षण मंडळाच्या युवा आयामाद्वारे या कार्यक्रमाचे आयोजन केले होते. ज्यासाठी पश्चिम महाराष्ट्रातील 347 उत्कृष्ट संशोधन पत्रांची निवड येथे केली होती. कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून माजी कुलगुरू आणि भारतीय शिक्षण मंडळाचे अखिल भारतीय कार्याध्यक्ष डॉ. सुहास पेडणेकर, मुख्य वक्ते म्हणून सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे प्र-कुलगुरू डॉ पराग काळकर, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे महानगर प्रचारक केदार कुलकर्णी उपस्थित होते.
व्हिजन फॉर विकसित भारत 2047 त्याची दिशा आणि उद्देश या विषयावर प्रमुख पाहुण्यांनी मार्गदर्शन केले. यावेळी भारतीय शिक्षण मंडळाचे महानगर अध्यक्ष डॉ. जितेंद्र होले, प्रांत युवा आयाम संयोजक डॉ. गणेश चव्हाण, प्रांत संशोधन प्रकल्प प्रमुख डॉ. अरुणा शिवराम, सहसंयोजक आशिष सरतापे, महानगर प्रचार प्रमुख पराग वाघमारे, महानगर कोष प्रमुख डॉ.विजय कुलकर्णी, महानगर सहमंत्री डॉ.पौर्णिमा तापस, महानगर मंत्री मयूर कडव व तुषार कुहिटे, कौशिक कृष्ण, डॉ.मीनल ओक, डॉ. प्रज्ञा कुलकर्णी, रोहिणी जमदाडे, प्रांत विस्तारक अश्र्वणी द्विवेदी उपस्थित होते.