एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील सरकारने एक क्रांतिकारी पाऊल टाकत मोठा निर्णय घेतला आहे. गावपातळीवरील अतिशय महत्वाची समजली जाणारी तलाठी आणि कोतवाल या पदांना नवीन नावं देत जुन्या नावांना तिलांजली दिली आहे. तलाठी हे आता ग्राम महसूल अधिकारी म्हणून ओळखले जातील तर कोतवाल हे महसुल सेवक म्हणून ओळखले जातील.
गावगाड्यातील आणि महसूली प्रशासकीय यंत्रणेत महत्वाचा वाटा या दोन्ही पदांचा आहे. या पदांना मध्ययुगीन कालीन इतिहास आहे. त्र्यंबक नारायण अत्रे यांच्या गावगाडा या पुस्तकात देखील या दोन्ही पदांची उत्क्रांती सांगितली आहे.
महसूल विभागातील एकमेव चतुर्थश्रेणी पद कोतवाल असतं.तो ग्रामपंचायतीचा पूर्णवेळ नोकर असतो.तलाठ्याला त्याच्या कामात मदत करणे हे त्याचं काम. तसच गावातील कोणत्याही कार्यक्रमाची दवंडी देणे हे त्याच आद्य कर्तव्य. त्याच्यावर नजिकच नियंत्रण तलाठ्याच असतं. तरं तलाठी हे महसुलाच्या प्रशासकीय यंत्रणेचे सगळ्यात शेवटचे अधिकारी. त्यांच्यावर नियंत्रण तहसीलदारांचं असतं. साधारण तलाठी – सर्कल अधिकारी – नायब तहसीलदार – तहसीलदार अशी ती श्रेणी आहे.आपल्या राज्यात तलाठी ते तहसीलदार अशी मजल मारणारे काही उदाहरणं आहेत. तरं महसूल विभागातील अव्वल कारकून सहाय्यक महसूल अधिकारी म्हणून ओळखले जाणार आहेत.