Narendra Modi : पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) 22 आणि 23 ऑक्टोबर रोजी रशियाला भेट देणार आहेत. रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतिन (Vladimir Putin) यांनी दिलेल्या निमंत्रणानंतर पंतप्रधान रशियाला जाणार आहेत. ब्रिक्स शिखर परिषदेत सहभागी होण्यासाठी पुतिन यांनी पंतप्रधानांना निमंत्रण दिले होते. त्यांचे निमंत्रण स्वीकारत पंतप्रधान मोदी दोन दिवशीय रशिया दौऱ्यावर जाणार आहेत. यावेळी रशियाच्या अध्यक्षतेखाली ब्रिक्स शिखर परिषद होत आहे. ही परिषद कझान येथे पार पडणार आहे.
एएनआयने दिलेल्या वृत्तानुसार, ‘पंतप्रधान नरेंद्र मोदी रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांच्या निमंत्रणावरून 22-23 ऑक्टोबर 2024 रोजी रशियाला भेट देणार आहेत. रशियाच्या अध्यक्षतेखाली कझान येथे होणाऱ्या 16व्या ब्रिक्स परिषदेत ते सहभागी होणार आहेत.’
पंतप्रधान मोदी त्यांच्या दौऱ्यादरम्यान, रशियातील कझान येथे त्यांचे समकक्ष आणि BRICS सदस्य देशांच्या नेत्यांसोबत द्विपक्षीय बैठका घेणार आहेत. ब्रिक्स परिषदेत पंतप्रधान मोदी चीनचे अध्यक्ष शी जिनपिंग यांचीही भेट घेऊ शकतात.
BRICS चे सदस्य देश कोणते आहेत?
यावेळी रशिया ब्रिक्सचे अध्यक्षपद भूषवत आहे. ब्रिक्समध्ये ब्राझील, रशिया, भारत, चीन आणि दक्षिण आफ्रिका यांचा समावेश आहे. एवढेच नाही तर सौदी अरेबिया, इराण, इथियोपिया, इजिप्त, अर्जेंटिना आणि संयुक्त अरब अमिराती हे ब्रिक्सचे नवीन सदस्य आहेत. अशा परिस्थितीत पीएम मोदी या सर्व देशांच्या नेत्यांची भेट घेऊ शकतात, त्यामुळे पीएम मोदींचा हा दोन दिवसांचा दौरा सर्वात महत्त्वाचा मानला जातो आहे.
Prime Minister Narendra Modi will visit Russia from 22-23 October 2024 at the invitation of Russian President Vladimir Putin, to attend the 16th BRICS Summit, being held in Kazan, under the Chairmanship of Russia.
During his visit, the Prime Minister is also expected to hold… pic.twitter.com/EtaYKqgebU
— ANI (@ANI) October 18, 2024
BRICS म्हणजे काय?
2006 मध्ये ब्राझिल, रशिया, भारत आणि चीन या देशांनी एकत्र येऊन ‘ब्रिक’ नावाचे संघटन तयार केली आहे. नंतर 2010 साली जेव्हा त्यात दक्षिण आफ्रिकेचा समावेश करण्यात आल्यानंतर या संघटनेचे नाव ‘ब्रिक्स’ असे झाले आहे.
BRICS देश एक संघटना म्हणून कार्य करतात. सदस्य देशांमधील आर्थिक सहकार्य वाढवण्याचा आणि जगामध्ये त्यांची आर्थिक आणि राजकीय स्थिती वाढवण्याचा प्रयत्न BRICS संघटना करते. BRICS संघटनेत आता नव्याने काही देशांचा समावेश करण्यात आल्याने आता BRICS संघटनेला BRICS+ असे नाव देण्यात आले आहे.