Kangana Ranaut : अभिनेत्री कंगना राणौतचा (Kangana Ranaut) आगामी चित्रपट ‘इमर्जन्सी’ गेल्या बऱ्याच दिवसांपासून वादात अडकला होता. आता कंगनाच्या या चित्रपटाला ग्रीन सिग्नल मिळाला असून, लवकरच चित्रपट प्रदर्शित होणार आहे.
सेन्सॉर बोर्डचे प्रमाणपत्र न मिळाल्याने चित्रपट गेल्या बऱ्याच दिवसांपासून अडकला होता. अखेर सेन्सॉर बोर्डाने सिनेमाला प्रमाणपत्र दिले असून, चित्रपट प्रदर्शित होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. अभिनेत्रीने स्वतः याबद्दलची माहिती दिली आहे. कंगनाने सोशल मीडियावर यासंबधीची पोस्ट शेअर करून माहिती दिली आहे.
कंगना तिच्या आगामी ‘इमर्जन्सी’ चित्रपटामध्ये माजी पंतप्रधान इंदिरा गांधींच्या भूमिकेत दिसणार आहे. त्यामुळे चाहते देखील या चित्रपटाबाबत उत्सुक आहेत. कंगनाचा हा चित्रपट 6 सप्टेंबरला रिलिज होणार होता पण तो सेन्सॉर बोर्डाच्या कात्रीत अडकला होता. त्यामुळे, चित्रपट नेमका कधी प्रदर्शित होणार? याबाबत प्रश्न निर्माण झाला होता. अखेर सेन्सॉर बोर्डानं ‘इमर्जन्सी’ चित्रपटाबाबत घेतलेल्या आक्षेपानंतर दुरूस्ती होताच या चित्रपटाच्या प्रदर्शनाला मंजुरी दिली असून, हा चित्रपट लवकरच चित्रपटगृहात रिलीज होणार आहे.
अभिनेत्री कंगनाने आपल्या सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत लिहिले, ‘आम्हाला सांगताना अत्यंत आनंद होत आहे की, ‘इमर्जन्सी’ चित्रपटाला सेन्सॉर प्रमाणपत्र मिळाले आहे. आम्ही लवकरच सिनेमाच्या प्रदर्शनाच्या तारीख जाहीर करणार आहोत.’
शीख संघटनांनी कंगनाच्या इमर्जन्सी चित्रपटामधील काही सीन्सवर आक्षेप घेतला होता. त्यानंतर तक्रार करण्यात आली होती. तसेच चित्रपटावर बंदी घालावी अशी मागणी देखील त्यांच्याकडून होत होती. हे प्रकरण कोर्टात जाऊन पोहचले यानंतर या चित्रपटाला सेन्सॉर बोर्डाचं प्रमाणपत्र थांबले यामुळेच इमर्जन्सी चित्रपट वेळेत प्रदर्शित होऊ शकला नाही.