Virat Kohli : भारत आणि न्यूझीलंडमध्ये (IND vs NZ) खेळल्या जात असलेल्या पहिल्या कसोटी सामन्यात विराट कोहलीने मोठी कामगिरी केली आहे. विराट कोहलीने न्यूझीलंडविरुद्ध 53 धावा करताच एक मोठा विक्रम आपल्या नावावर केला आहे. पहिल्या डावात विराट खाते न उघडताच पॅव्हेलियनमध्ये परतला पण दुसऱ्या डावात त्याने सावध खेळ करत 15 चेंडूत पहिली धाव घेतली. नंतर त्याने 70 चेंडूत आपले अर्धशतक पूर्ण केले आहे.
या डावात विराट कोहलीने 9000 धावा पूर्ण केल्या आहेत. आणि अशी कामगिरी करणारा तो चौथा भारतीय खेळाडू ठरला आहे. याआधी हा विक्रम फक्त सचिन तेंडुलकर, राहुल द्रविड आणि सुनील गावस्कर यांच्या नावावर होता. आता या यादीत विराट कोहलीचा देखील समावेश झाला आहे. विराट कोहलीने 197 डावांमध्ये 9000 धावा करण्याचा पराक्रम केला आहे. भारताकडून कसोटी क्रिकेटमध्ये सचिन तेंडुलकरने सर्वाधिक धावा केल्या आहेत. त्याने 15921 धावा केल्या आहेत.
𝟗𝟎𝟎𝟎 𝐓𝐞𝐬𝐭 𝐫𝐮𝐧𝐬 𝐚𝐧𝐝 𝐜𝐨𝐮𝐧𝐭𝐢𝐧𝐠….
A career milestone for @imVkohli 👏👏
He is the fourth Indian batter to achieve this feat.#INDvNZ @IDFCFIRSTBank pic.twitter.com/Bn9svKrgtl
— BCCI (@BCCI) October 18, 2024
सचिन तेंडुलकरनंतर राहुल द्रविडने भारताकडून सर्वाधिक धावा केल्या आहेत. त्याने 163 सामन्यात 13265 धावा केल्या आहेत. भारताकडून कसोटी क्रिकेटमध्ये १० हजारांहून अधिक धावा करण्याचा विक्रम सुनील गावसकर यांनी पहिला केला होता. सुनील गावस्कर यांनी 125 सामन्यात 10122 धावा केल्या होत्या.
भारताचा माजी कर्णधार आणि अनुभवी खेळाडू विराट कोहलीने आतापर्यंत 116 कसोटी सामने खेळताना 9000 हून अधिक धावा केल्या आहेत. ज्यामध्ये 29 शतकांचा समावेश आहे. या काळात त्याने आपल्या बॅटने सात द्विशतकेही झळकावली आहेत. त्याची सर्वोत्तम धावसंख्या 254 आहे. या सामन्यात विराट कोहलीने 70 धावा केल्या आहेत.