Narendra Modi : पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) आज (रविवारी) वाराणसी (Varanasi) दौऱ्यावर जाणार आहेत. दिवाळीपूर्वी पंतप्रधानांचा हा दौरा केवळ बनारससाठीच नाही तर संपूर्ण देशासाठी महत्त्वाचा आहे. बनारसला पंतप्रधान 32 कोटी रुपयांहून अधिक किमतीच्या योजना भेट देणार आहेत.
याशिवाय देशभरातील विमानतळांसह अन्य योजनांसाठी सुमारे 3400 कोटी रुपयांच्या योजनांची भेट देणार आहेत. 2870 कोटी रुपये खर्चून बांधण्यात येणाऱ्या बनारसच्या विमानतळाच्या नव्या इमारतीची पायाभरणीही पंतप्रधान मोदी आज करणार आहेत. आज पंतप्रधान संपूर्ण देशाला 6611 कोटी रुपयांचे एकूण 23 प्रकल्प भेट देणार आहेत. यूपी आणि 7 शहरांव्यतिरिक्त, यामध्ये मध्य प्रदेश, छत्तीसगड, पश्चिम बंगाल आणि बिहारच्या प्रकल्पांचा देखील समावेश आहे.
विमानतळाच्या नव्या इमारतीच्या पायाभरणीनंतर बनारस विमानतळाची प्रतिमा बदलणार आहे. आता बनारस विमानतळ देशातील प्रसिद्ध ग्रामीण आणि मोठ्या विमानतळांमध्ये सामील होणार आहे. आज वाराणसीच्या क्रीडा संकुलाचा उद्घाटन सोहळाही पडणार आहे. यावेळी मोदींच्या हस्ते कांची कामकोटी मठाने 110 कोटी रुपयांहून अधिक खर्च करून तयार केलेल्या आरजे शंकरा नेत्रालयाचे उद्घाटनही होणार आहे. यावेळी मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ आणि राज्यपाल आनंदीबेन पटेल हेही उपस्थित राहणार आहेत.
असा असेल कार्यक्रम?
आज दुपारी 2 वाजता पीएम मोदी आरजे शंकर आय हॉस्पिटलचे उद्घाटन करतील. यानंतर, दुपारी 4.15 वाजता ते वाराणसीमध्ये अनेक विकास प्रकल्पांचे उद्घाटन आणि पायाभरणी करतील. यावेळी पंतप्रधान मोदी एका जाहीर सभेला देखील संबोधित करणार आहेत.
प्रधानमंत्री श्री @narendramodi के 20 अक्टूबर, 2024 को वाराणसी में सार्वजनिक कार्यक्रम।
लाइव देखें:
📺https://t.co/wbMZVxAFoT
📺https://t.co/FbMYnsUa6D
📺https://t.co/oQvC5vVvL8 pic.twitter.com/Is1gXtDwwQ— BJP Uttar Pradesh (@BJP4UP) October 19, 2024
24 आयपीएस अधिकाऱ्यांकडे सुरक्षेची जबाबदारी
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे रविवारी शहरात आगमन होत असताना 24 आयपीएस अधिकारी सुरक्षा व्यवस्थेची जबाबदारी सांभाळणार आहेत. एसपीजी, एनएसजी आणि एटीएस कमांडो केंद्रीय गुप्तचर संस्थांचे अधिकारी, केंद्रीय सशस्त्र पोलीस दलाचे जवान, पोलीस आणि पीएसी कर्मचारी पंतप्रधानांच्या सुरक्षेसाठी तैनात असतील.