Salman Khan : राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजित पवार गटातील नेते आणि माजी मंत्री बाबा सिद्दीकी (Baba Siddique) यांची १२ ऑक्टोबर रोजी गोळी घालून हत्या करण्यात आली होती. सिद्दीकीच्या हत्येची जबाबदारी लॉरेन्स बिश्नोईच्या (Lawrence Bishnoi) टोळीने स्वीकारली आहे. सिद्दीकीच्या हत्येनंतर आता बॉलिवूड अभिनेता सलमानच्या अडचणी वाढल्या आहेत. सिद्दीकीनंतर सलमान खानच्या जीवाला देखील धोका असल्याचे सांगण्यात येत आहेत.
कथित काळवीट शिकार प्रकरणात सलमान खानला अनेक वर्षांपासून जीवे मारण्याच्या धमक्या येत आहेत. अशातच बाबा सिद्दीकी यांची हत्या झाल्यानंतर सलमानच्या जीवाला आणखीनच धोका वाढल्याचे सांगण्यात येत आहे. यादरम्यानच आता सलमानच्या वडिलांची सलीम खान यांची महत्वाची प्रतिक्रिया समोर येत आहे.
तुरुंगात असलेला गँगस्टर लॉरेन्स बिश्नोई याने सलमान खानला धमकी दिली आहे जर अभिनेत्याने काळवीट शिकार प्रकरणात माफी मागितली नाही तर त्याला गंभीर परिणामांना सामोरे जावे लागेल. सलमानने काळवीट मारून आमच्या समाजाचा अपमान केल्याचे बिश्नोई याने म्हटले आहे.
यावरच आता सलीम खान यांनी असा दावा केला आहे की, त्यांच्या मुलाने कधीही कोणत्याही प्राण्याला इजा केली नाही आणि काळवीट शिकार घटनेच्या वेळी तो तिथे उपस्थित नव्हता. असे सलीम खान यांनी म्हंटले आहे. ‘सलमान प्राण्यांवर खूप प्रेम करतो, सलमानने त्याच्या आजारी पाळीव श्वानाची खूप काळजी घेतली आणि जेव्हा त्याला मरण आले तेव्हा सलमान खूप रडला होता. जेव्हा सलीम खान यांनी सलमानला विचारले की तू कथित काळवीट शिकार प्रकरणात गुंतला आहे का, तेव्हा सलमानने ते नाकारले आणि जेव्हा हे घडले तेव्हा तो घटनास्थळी नव्हता असे त्याने ठामपणे सांगितले आहे. सलीम खान म्हणाले, “सलमान माझ्याशी खोटं बोलणार नाही. त्याला प्राणी मारण्याचा शौक नाही. त्याला प्राण्यांवर खूप प्रेम आहे.”
सलीम खान पुढे म्हणाले, “माफी मागणे म्हणजे मी मारले हे मान्य करणे होय. सलमानने कधीही कोणत्याही प्राण्याची हत्या केली नाही. आम्ही कधी झुरळही मारले नाही.’ असे सलीम खान म्हणाले आहेत.
सलीम खान खंत व्यक्त करत म्हणाले, “सलमान जाऊन कोणाची माफी मागणार? तुम्ही किती लोकांची माफी मागितली आहे, किती प्राण्यांना वाचवले आहे? सलीम खानने यांनी सलमान खानच्या बचावात, त्याने कोणताही गुन्हा केला नसल्याचे म्हटले आहे. खरंच गुन्हा केला आहे का? तुम्ही पाहिलंय का? तिथे तपास झाला आहे का? असे सवाल सलीम खान यांनी यावेळी उपस्थित केले आहेत.