Remo D’Souza : कोरिओग्राफर आणि दिग्दर्शन रेमो डिसूझा (Remo D’Souza) मोठ्या अडचणीत सापडला आहे. 8 वर्षांपूर्वी त्याच्यावर झालेल्या फसवणुकीच्या गुन्ह्याची अजूनही सुनावणी सुरू आहे. त्यातच आता त्याच्यावर आणखीन एक गुन्हा दाखल करण्यात आला आहे. रेमोवर १२ कोटी रुपयांच्या घोटाळ्याचा आरोप करण्यात आला आहे. हा आरोप एका डान्स ग्रुपने केला आहे.
अलीकडेच त्याच्यावर आणि त्याची पत्नीसह आणखी 7 जणांवर फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हे प्रकरण एका डान्स ग्रुपकडून 12 कोटी रुपयांच्या घोटाळ्याचे आहे.
रेमो डिसूझाला यापूर्वीही अनेक फसवणुकीच्या प्रकरणांना सामोरे जावे लागले आहे. त्याच्यावर 8 वर्षांपूर्वी असाच गुन्हा दाखल झाला होता, ज्याची सुनावणी अजूनही सुरू आहे. आता नवीन प्रकरणामुळे रेमोच्या अडचणी आणखीन वाढणार असल्याचे चित्र दिसत आहे.
काय आहे संपूर्ण प्रकरण?
यावेळी रेमो आणि लीझेलसह इतर सात जणांवर मुंबईतील मीरा रोड पोलिस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 26 वर्षीय नर्तिकेने 2018 ते जुलै 2024 दरम्यान आपली आणि त्याच्या ग्रुपची फसवणूक केल्या प्रकरणी हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या ग्रुपने टेलिव्हिजन शो जिंकला होता, पण बक्षिसाची रक्कम योग्य प्रकारे दिली गेली नसल्याचा आरोप या तक्रारीत करण्यात आला आहे.
रेमोशिवाय या एफआयआरमध्ये ओमप्रकाश शंकर चौहान, रोहित जाधव, फ्रेम प्रोडक्शन कंपनी, विनोद राऊत आणि एक पोलीस कर्मचारी रमेश गुप्ता यांचाही समावेश आहे. पोलीस या प्रकरणाचा तपास करत असून सर्व आरोपींची चौकशी करण्यात येत आहे.
फसवणुकीच्या आरोपाचा रेमो डिसूझाच्या कामावर मोठा परिणाम होऊ शकतो. याआधीही त्याच्यावर एका चित्रपट निर्मितीसाठी ५ कोटी रुपये घेतल्याचा आरोप करण्यात आला होता, या वर्षी ऑगस्टमध्ये अलाहाबाद उच्च न्यायालयाने त्याची मदत याचिका फेटाळून लावली होती, ज्यामुळे त्याच्या अडचणीत आणखी वाढ झाली होती.
यावेळी रेमो आणि त्याच्या पत्नीवर झालेल्या आरोपांमुळे त्याच्या चाहत्यांना धक्का बसला आहे. सिनेविश्वातील त्याचे स्थान आणि आधीच सुरू असलेल्या खटल्यांमध्ये, आता ही नवीन केस कोणते वळण घेणार हे पाहणे बाकी आहे.