Maharashtra Assembly Election : सध्या राज्यात लाडकी बहीण योजनेची जोरदार चर्चा सुरु आहे. विधानसभा निवडणुकीत (Maharashtra Assembly Election) ही योजना आपल्याला पुन्हा सत्ता मिळवून देणार, असा विश्वास सत्ताधाऱ्यांना आहे. पण सरकारच्या या योजनेबाबत मोठी अपडेट समोर आली आहे.
नुकत्याच महाराष्ट्रात विधानसभा निडणुकांच्या तारखा जाहीर करण्यात आल्या आहेत. राज्यात एकाच टप्प्यात निवडणूक होत असून, येत्या 20 नोव्हेंबरला महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकीसाठी मतदान पार पडेल. तर 23 नोव्हेंबरला निकाल जाहीर होणार आहेत. अशातच आता राज्यात आचारसंहिता लागू झाली आहे.
याचदरम्यान, निवडणूक आयोगाने राज्य सरकारला आचार संहिता लागू असताना मतदारांवर प्रभाव टाकणाऱ्या आर्थिक योजनांना बंद करण्याचे निर्देश दिले आहेत. त्यामुळे लाडकी बहीण योजनेचा हप्ता कधी मिळणार? हा प्रश्न उपस्थित झाला आहे. याविषयी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे. नवी दिल्लीमध्ये पत्रकारांशी बोलताना याविषयी त्यांनी स्पष्टीकरण दिले आहे.
काय म्हणाले मुख्यमंंत्री?
राज्यातील लाडक्या बहिणी योजनेवर मुख्यमंत्री म्हणाले, ‘आमची नीयत साफ आहे, आमची देण्याची वृत्ती आहे. पुढे त्यांनी असे देखील स्पष्ट केले आहे की, लाडक्या बहिणीला कायम पैसे मिळत राहतील. आमच्या सरकारने ॲडव्हान्समध्ये पैसे दिले आहेत. आचारसंहिता लागू होण्यापूर्वीच लाडक्या बहिणींना दोन महिन्यांचा हप्ता जमा झाला आहे, असं देखील मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले आहे.
महाराष्ट्रातील निवडणुकीची अधिसूचना 22 ऑक्टोबर रोजी सादर केली जाणार असून, उमेदवारांना अर्ज दाखल करण्यासाठी 29 ऑक्टोबर ही शेवटची तारीख असेल. तर 30 ऑक्टोबरला अर्जांची छाननी होईल. उमेदवारांना अर्ज मागे घेण्यासाठी 4 नोव्हेंबर पर्यंत वेळ असेल.