Lawrence Bishnoi : महाराष्ट्रातील राष्ट्रवादी काँग्रेसचे (अजित गट) नेते आणि माजी मंत्री बाबा सिद्दीकी (Baba Siddique) यांच्या हत्येनंतर, त्यांचा मुलगा झीशान सिद्दिकी (Zeeshan Siddique) याने लॉरेन्स बिश्नोई गँगविरोधात सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर केली आहे. ज्यात त्याने लिहिले आहे, ‘माझे वडील सिंह होते…माझ्या नसांमध्ये सिंहाचे रक्त वाहत आहे. मी अजूनही निर्भय आणि स्थिर आहे.’
पोलीस सध्या बाबा सिद्दीकीच्या हत्येच्या शोध घेत असून, मुंबई पोलिसांना बाबा सिद्दीकीच्या मारेकऱ्यांच्या मोबाईलमध्ये झीशान सिद्दिकीचा देखील फोटो सापडला आहे.
अशा परिस्थितीत झीशान सिद्दिकीच्या जीवालाही धोका होता, असे म्हंटले जात आहे. वडील बाबा सिद्दीकी किंवा मुलगा झीशान सिद्दीकी यांच्यात कोणाला मारण्यासाठी शूटर आला होता, याचा शोध आता पोलीस घेत आहेत. दरम्यान, वडिलांच्या मृत्यूनंतर जीशान सिद्दीकी सोशल मीडियावर सतत पोस्ट करत आहे.
बाबा सिद्दीकी यांचा मुलगा झीशान सिद्दीकी याने X वर पोस्ट शेअर करत लिहिले, ‘त्यांनी माझ्या वडिलांची हत्या केली आहे, पण ते विसरलेत की माझे वडील सिंह होते आणि त्यांचे रक्त माझ्या नसांमध्ये वाहत आहे. ते नेहमी न्यायासाठी उभे राहिले, परिवर्तनासाठी लढले आणि अतुलनीय धैर्याने वादळांना तोंड दिले आहे.’
त्याने पुढे लिहिले की, ‘ज्यांनी त्यांना खाली पाडले ते आता जिंकल्याचा विश्वास घेऊन माझ्याकडे बघत आहेत, माझ्या नसांमध्ये सिंहाचे रक्त वाहत आहे. मी अजूनही इथेच आहे, बिनधास्त आणि स्थिर आहे. त्यांनी सिंहाला मारले, पण मी त्यांच्या जागी उभा आहे. हा लढा अजून संपलेला नाही. आज, ते जिथे उभे होते तिथे मी उभा आहे. अशी पोस्ट झीशान सिद्दीकीने केली आहे.