Maharashtra Assembly Elections 2024 : महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीचे बिगुल (Maharashtra Assembly Elections) वाजताच भाजपकडून आज (रविवारी) उमेदवारांची पहिली यादी जाहीर करण्यात आली आहे. भाजपने जाहीर केलेल्या 99 उमेदवारांच्या यादीत प्रामुख्याने समावेश महिलांचा समावेश दिसून आला आहे. भाजपने आपल्या यादीत 13 महिलांना उमेदवारी दिली आहे. यात नुकतेच भाजपमध्ये प्रवेश केलेले काँग्रेसचे बडे नेते अशोक चव्हाण यांच्या मुलीला देखील भोकर विधानसभा मतदारसंघातून उमेदवारी देण्यात आलेली आहे.
अशोक चव्हाण यांची लेक श्रीजया अशोक चव्हाण यांना पक्षाकडून संधी देण्यात आली आहे. श्रीजया चव्हाण यांना भोकर मतदारसंघातून विधानसभेच्या रिंगणात उतरवण्याचा निर्णय पक्षाकडून घेण्यात आला. त्यामुळे येत्या काळात या मतदारसंघातून काँगेसकडून कोणाला उमेदवारी दिली जाणार याकडे सगळ्यांचे लक्ष लागून आहे.
दुसरीकडे फुलंब्री मतदारसंघ हा राज्यपाल हरिभाऊ बागडे यांचा होता. ते राज्यपाल झाल्याने त्यांच्या जागी भाजपने अनुराधा चव्हाण यांना संधी देण्यात आली आहे.
भाजपने जाहीर केलेल्या पहिल्या यादीतील महिला उमेदवार
1) श्रीजया अशोक चव्हाण – भोकर
2) अनुराधाताई अतुल चव्हाण – फुलंब्री
3) सीमाताई महेश हिरे – नाशिक पश्चिम
4) सुलभा गायकवाड – कल्याण पूर्व
5) मंदा विजय म्हात्रे – बेलापूर
6) मनीषा अशोक चौधरी – दहिसर
7) गोरेगांव – विद्या ठाकूर
8) माधुरी सतीश मिसाळ – पर्वती
9) मोनिका राजीव राजले – शेगाव
10) प्रतिभा पचपुते – श्रीगोंदा
11) नमिता मुंदडा – केज
12) श्वेता महाले – चिखली
13) मेघना बोर्डीकर – जिंतूर
श्रीजया चव्हाण यांना भोकर मतदारसंघातून संधी देण्यात आल्यानंतर अशोक चव्हाण यांनी आनंद व्यक्त केला आहे. येथून श्रीजया यांना चांगला प्रतिसाद मिळेल असा विश्वास देखील व्यक्त त्यांनी केला आहे. श्रीजया यांनी या मतदारसंघात अधिक चांगली कामे केली आहेत. त्यामुळे त्यांना अधिक बळ मिळेल, असेही अशोक चव्हाण यावेळी म्हणाले आहेत.