Jammu-Kashmir : रविवारी (20 ऑक्टोबर) रात्री, जम्मू-काश्मीरमध्ये (Jammu-Kashmir) पुन्हा एकदा पाकिस्तानी दहशतवाद्यांनी सर्व सामान्य नागरिकांना लक्ष केले आहे. ही घटना गंदरबल जिल्ह्यात घडली आहे. गंदरबल जिल्ह्यात बोगदा बांधणाऱ्या खासगी कंपनीच्या कॅम्पवर दहशतवाद्यांनी हा हल्ला केला आहे. या दहशतवादी हल्ल्यात सहा कामगार आणि एका डॉक्टरचा मृत्यू झाला आहे. या घटनेत मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता वर्तवली जात आहे. या घटनेवर केंद्रीय गृहमंत्री अमित शहा (Amit Shah) यांनी तीव्र निषेध व्यक्त केला आहे. तसेच जम्मू-काश्मीरचे मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला (Omar Abdullah) यांनीही या घटनेवर प्रतिक्रिया दिली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, काश्मीरमधील गंदरबल जिल्ह्यात बोगदा बांधणाऱ्या खासगी कंपनीच्या कॅम्पवर दहशतवाद्यांनी हा हल्ला केला. रात्री 8.15 च्या सुमारास दहशतवाद्यांनी स्वयंचलित शस्त्रांनी अंदाधुंद गोळीबार केला. कामगार जेवणासाठी मेसजवळ पोहोचले असताना हा दहशतवादी हल्ला करण्यात आला होता.
या दहशतवादी हल्ल्यानंतर जम्मू-काश्मीरचे मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांनी या घटनेचा तीव्र निषेध केला आहे. ओमर अब्दुल्ला यांनी जम्मू-काश्मीरच्या मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतल्यानंतर अवघ्या चार दिवसांनी हा दहशतवादी हल्ला झाला आहे.
ओमर अब्दुल्ला यांनी ट्विटरवर लिहिले की, ‘रविवारी झालेल्या दहशदवादी हल्ल्यात मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता आहे. या घटनेत दोन ते तीन जण जखमी झाले आहेत. जखमी झालेल्यांसाठी प्रार्थना करतो ते लवकर बरे व्हावेत…’
दुसरीकडे, लेफ्टनंट गव्हर्नर मनोज सिन्हा यांनी नागरिकांवरील या घृणास्पद दहशतवादी हल्ल्याचा तीव्र निषेध केला आहे. सिन्हा यांनी ‘X’ वरील पोस्टमध्ये म्हटले आहे की, ‘मी नागरिकांना आश्वासन देतो की या घृणास्पद कृत्यामागे असलेल्यांना सोडले जाणार नाही. आम्ही जम्मू-काश्मीर पोलीस, लष्कर आणि सुरक्षा दलांना पूर्ण स्वातंत्र्य दिले आहे.’ असे ट्विट त्यांनी केले आहे.
केंद्रीय गृह मंत्री अमित शाह ने ट्वीट किया, "जम्मू-कश्मीर के गगनगीर में नागरिकों पर हुआ नृशंस आतंकी हमला कायरतापूर्ण घृणित कृत्य है। इस जघन्य कृत्य में शामिल लोगों को बख्शा नहीं जाएगा और उन्हें हमारे सुरक्षा बलों की ओर से कड़ी से कड़ी प्रतिक्रिया का सामना करना पड़ेगा। इस अत्यंत… pic.twitter.com/ff1gjrRk6m
— ANI_HindiNews (@AHindinews) October 20, 2024
दहशतवाद्यांना सोडले जाणार नाही : अमित शहा
जम्मू-काश्मीर मधील घटनेवर अमित शाह यांनी ट्विट करत लिहिले की, ‘जम्मू-काश्मीरमध्ये झालेला क्रूर दहशतवादी हल्ला हे भ्याड कृत्य आहे. या घृणास्पद कृत्यात सहभागी असलेल्यांना सोडले जाणार नाही आणि त्यांना आमच्या सुरक्षा दलांच्या कठोर कारवाईला सामोरे जावे लागेल.’ या दु:खाच्या प्रसंगी, मी मृतांच्या कुटुंबीयांसाठी संवेदना व्यक्त करतो आणि जखमींच्या लवकरात लवकर बरे होण्यासाठी प्रार्थना करतो.’
जम्मू-काश्मीरमधील गांदरबल जिल्ह्यात दहशतवाद्यांनी पुन्हा एकदा स्थलांतरित मजुरांना लक्ष्य केले आहे. दहशतवाद्यांनी एका डॉक्टरसह 7 जणांची गोळ्या झाडून हत्या केली, तर 5 जण जखमी झाल्याचे सांगण्यात येत आहे. अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार , गुंड, गांदरबल येथील बोगद्याच्या प्रकल्पावर काम करणारे कामगार आणि इतर कर्मचारी संध्याकाळी उशिरा त्यांच्या छावणीत परतले, त्यानंतर अज्ञात दहशतवाद्यांनी हा हल्ला केला आहे.