Earthquake News : मराठवाड्यात नांदेड (Nanded) आणि हिंगोलीमध्ये (Hingoli) भूकंपांचे धक्के (Earthquake) बसले आहेत. आज सकाळच्या सुमारास हे धक्के जाणवले आहेत. नागरिक साखर झोपेत असताना भूकंपाचे धक्के बसल्यामुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. भूकंपाचे धक्के जाणवताच नागरिकांनी घराबाहेर धाव घेतली.
भूकंपाचे धक्के नांदेडच्या हदगाव तालुक्यातील २ गावांना भूकंपाचे बसले आहेत. तसेच हिंगोलीच्या कळमनुरी, औंढा तालुक्यात भूकंपाचे धक्के जाणवले आहेत. नांदेडमध्ये आलेल्या भूकंपाच्या धक्क्याची नोंद ३.८ रिश्टर स्केल करण्यात आली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, नांदेड जिल्ह्यात सातत्याने भूकंपाचे धक्के जाणवत आहेत. मागील ३ महिन्यातील हा तिसरा भूकंपाचा धक्का आहे. आज सकाळी सहा वाजताच्या सुमारास नांदेड जिल्ह्याच्या हदगाव तालुक्यातील सावरगाव आणि मनाठा या गावांच्या परिसरात भूकंपाचा धक्का जाणवला आहे.
नांदेडच्या हदगाव तालुक्यातील पश्चिमेस असलेल्या सावरगाव हे या भूकंपाचे केंद्र बिंदू दाखवत आहे. या भूकंपाच्या धक्क्याने या परिसरातील नागरिकांमध्ये एकच खळबळ उडाली आहे. भूकंपाचे हे धक्के सौम्य असले तरी देखील परिसरात भीतीचे वातारण आहे.
दुसरीकडे, हिंगोली जिल्ह्यात देखील पुन्हा एकदा भूकंपाचे धक्के जाणवले आहेत. हिंगोलीत देखील सकाळच्या सुमारास भूकंपाचे धक्के जाणवले आहेत. हिंगोलीच्या कळमनुरीसह औढा तालुक्यातील १५ गावांमध्ये भूकंपेचा धक्के बसले आहेत.
या भूकंपाचे कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही, अशास्थितीत प्रशासनाने सतर्क राहण्याचे आवाहन केले आहे. तसेच काळजीचे देखील आवाहन केले आहे. सध्या हिंगोलीमधील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे. कारण यापूर्वी देखील असेच भूकंपाचे धक्के जाणवले आहेत.