UP News : मायावती सरकारच्या काळात झालेल्या स्मारक घोटाळ्याप्रकरणी आता ईडीने (ED) मोठी कारवाई केली आहे. उत्तर प्रदेशातील बहुजन समाज पक्षाच्या सरकारच्या काळात झालेल्या १४०० कोटी रुपयांच्या कथित स्मारक घोटाळ्यात भारतीय जनता पक्षाचे आमदार अडकल्याचे दिसत आहे.
टी राम यांच्या भूमिकेवर ईडीने प्रश्न उपस्थित
या स्मारक घोटाळा प्रकरणी ईडीने भाजप आमदार त्रिभुवन राम यांना समन्स बजावले आहे. वाराणसीच्या अजगरा विधानसभा मतदारसंघातील भाजप आमदार टी राम यांच्या भूमिकेवर ईडीने प्रश्न उपस्थित केले आहेत.
दिवाळीपूर्वी ईडीसमोर हजर राहण्याचे आदेश
मिळालेल्या माहितीनुसार, अभियंता आणि आमदार या दोघांनाही दिवाळीपूर्वी ईडीसमोर हजर राहण्याचे आदेश देण्यात आले आहेत. या प्रकरणी ईडीने सार्वजनिक बांधकाम विभागाचे तत्कालीन मुख्य अभियंता त्रिभुवन राम यांनाही समन्स बजावले आहे.
दरम्यान, स्मारकाच्या मुद्द्यावर स्पष्टीकरण देताना भाजप आमदार म्हणाले आहेत की, त्यांचा याच्याशी काहीही संबंध नाही. ते म्हणाले, ‘याआधी मी माझ्या निवेदनात स्पष्ट केले आहे की, या प्रकरणात माझा सहभाग नाही.’
या प्रकरणी नसीमुद्दीन सिद्दीकी, बाबू सिंह कुशवाह यांच्यासह बसपा सरकारमध्ये मंत्री राहिलेल्या अनेकांवर एफआयआर दाखल करण्यात आला होता. 2012 मध्ये माजी मंत्र्यांसह 19 जणांविरुद्ध एफआयएल दाखल करण्यात आली होती. या प्रकरणात लोकायुक्तांच्या तपासातही 1400 कोटींचा घोटाळा झाल्याची पुष्टी झाली होती. सपा सरकारच्या काळात तपास मंदावला आणि इतर तपास यंत्रणाही गप्प राहिल्या होत्या. मात्र, आता तपास यंत्रणा पुन्हा कमला लागल्या आहेत.
2012 मध्ये सुरू झालेल्या तपासात बाबू सिंह कुशवाह, नसीमुद्दीन, सीपी सिंह आणि सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांवर चौकशी सुरू झाली होती.