Maharashtra Assembly Elections 2024 : महाराष्ट्रातील निवडणुक (Maharashtra Assembly Elections 2024) आता तोंडावर येऊन ठेपली आहे. अशातच राज्यात राजकीय घडामोडींना वेग आला आहे. अनेक पक्षांकडून त्यांच्या उमेदवारांची यादी जाहीर होण्यास सुरुवात झाली आहे. याचदरम्यान, महायुतीतील सर्वच पक्षांनी आपली पहिली यादी जाहीर केली आहे.
रविवारी भाजपने आपल्या 99 उमेदवारांची नावे जाहीर केली आहे. तर आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे शिवसेनेची पहिली यादी देखील जाहीर झाली आहे. या यादीत एकूण 45 जणांची नावे घोषित करण्यात आली आहे. त्यानंतर आता अजित पवारांच्या पक्षानेही पहिली यादी जाहीर करत निवडणुकीसाठी कंबर कसली आहे. पहिल्या यादीत अजित पवारांनी 38 उमेदवारांच्या नावाची घोषणा केली आहे.
यादी जाहीर करताना अजित पवार यांनी एक मोठा डाव टाकला आहे. आतापर्यंत अजित पवार हे बारामतीमधून लढणार की नाहीत असा संभ्रम कायम होता. मात्र, आता तेच बारामती विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढवणार असल्याचे आता समोर आले आहे.
राष्ट्रवादी (अजित पवार) उमेदवारांची नावे
अजित पवार- बारामती
दीलिप वळसे पाटील- आंबेगाव
सुलभा खोडके- अमरावती
दत्ता भरणे- इंदापूर
अण्णा बनसोडे-पिंपरी
निर्मला विटेकर-पाथरी
सुनील शेळके-मावळ
छगन भुजबळ- येवला
हसन मुश्रीफ-कागल
माणिकराव कोकाटे- सिन्नर
नरहरी झिरवळ – दिंडोरी
धनंजय मुंडे – परळी
दौलत दरोडा – शहापूर
हिरामण खोसकर – इगतपुरी
अनिल पाटील – अमळनेर
संग्राम जगताप – अहमदनगर
आदिती तटकरे – श्रीवर्धन
संजय बनसोडे- उदगीर
बाबासाहेब पाटील – अहमदपूर
दिलीप मोहिते-पाटील – खेड-आळंदी
राजकुमार बडोले – अजुर्नी मोरगाव
प्रकाश सोळंखे – माजलगाव
मकरंद पाटील – वाई
आशुतोष काळे – कोपरगाव
इंद्रनील नाईक – पुसद
भरत गावित – नवापूर
नजीब मुल्ला – मुंब्रा-कळवा
किरण लहामटे – अकोले
शेखर निकम – चिपळूण
यशवंत माने – मोहोळ
राजेश पाटील – चंदगड
हिरामण खोसकर – इगतपुरी
राजू कारेमोरे – तुमसर
चंद्रकांत नवघरे – वसमत
नितीन पवार – कळवण
धर्मराव बाबा आत्राम – अहेरी
अतुल बेनके – जुन्नर
चेतन तुपे – हडपसर