Maharashtra Assembly Elections 2024 : विधानसभा निवडणुकीसाठी आजपासून (२२ ऑक्टोबर) पासून अर्ज भरण्यास सुरुवात झाली आहे. महायुती आणि महाविकास आघाडीचे जागा वाटपाचे काम जवळ-जवळ संपत आले आहे. महायुतीतील सर्वच पक्षांनी आपल्या उमेवारांची पहिली यादी जाहीर केली असून, दुसरीकडे महाविकास आघाडीतील शिवसेनेने (उद्धव बाळासाहेब ठाकरे) आपली पहिली यादी जाहीर केली आहे.
दरम्यान, आज २४ ऑक्टोबर रोजी गुरुपुष्यामृत असल्याने उमेदवारांनी आजच्या दिवसाचा मुहूर्त साधत उमेदवारी अर्ज भरला आहे. महायुती आणि महाविकास आघाडीतील सर्वच राजकीय पक्षातील काही प्रमुख उमेदवारांनी आज आपआपले उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत.
आज ‘या’ नेत्यांनी भरले उमेदवारी अर्ज
रोहित पाटील (महाविकास आघाडी)
हर्षवर्धन पाटील (महाविकास आघाडी)
रणजीत शिंदे (अपक्ष)
अर्जुन खोतकर (महायुती)
अविनाश जाधव (मनसे)
धनंजय मुंडे (महायुती)
चंद्रकांत पाटील (महायुती)
छगन भुजबळ (महायुती)
अद्वय हीरे (महाविकास आघाडी)
राजन विचारे (महाविकास आघाडी)
जितेंद्र आव्हाड (महाविकास आघाडी)
संतोष बांगर (महायुती)
भागिरथ भालके (अपक्ष)
राजू पाटील (मनसे)
सुलभा गायकवाड (महायुती)
वसंत गीते (महाविकास आघाडी)
सुधीर गाडगीळ (महायुती)
सुरेश खाडे (महायुती)
सुहास बाबर (महायुती)
भास्कर जाधव (महाविकास आघाडी)
आदित्य ठाकरे (महाविकास आघाडी)
अतुल भातखळकर (महायुती)
मंगलप्रभात लोढा (महायुती)
विक्रम सावंत (महायुती)
योगेश कदम (महायुती)
यशोमती ठाकूर (महाविकास आघाडी)
बंटी भांगडिया (महायुती)
विनोद अग्रवाल (महायुती)
अमित साटम (महायुती)
मिहिर कोटेचा (महायुती)
कालिदास कोळंबकर (महायुती)
पराग अळवणी (महायुती)
संजय राठोड (महायुती)
समरजीत घाटगे (महायुती)
दिलिप वळसे पाटील (महायुती)
राधाकृष्ण विखे पाटील (महायुती)
हीरामण खोसकर (महायुती)
माणिकराव कोकाटे (महायुती)
नरहरी झिरवळ (महायुती)
राणी लंके (महाविकास आघाडी)
प्रशांत बंब (महायुती)
राजेश टोपे (महाविकास आघाडी)
सुभाष देशमुख (महायुती)
अमल महाडिक (महायुती)
राजेंद्र पाटील यड्रावकर (महायुती)
संग्राम थोपटे (महायुती)
अनिल पाटील (महायुती)
सुनील अण्णा शेळके (महायुती)