Raj Thackeray : राज ठाकरे यांच्या महाराष्ट्र नवनिर्माण सेना पक्षाकडून विधानसभा निवडणुकीसाठी तिसरी यादी जाहीर करण्यात आली आहे. तिसऱ्या यादीत मनसेने 13 जागांवरील उमेदवारांच्या नावांची घोषणा केली आहे. या यादीत विदर्भ, उत्तर महाराष्ट्र, मराठवाडा, पालघर आणि ठाण्यातील उमेदवारांच्या नावांची घोषणा केली आहे.
विशेष बाब म्हणजे राज ठाकरे यांनी कृषी मंत्री धनंजय मुंडे यांच्या विरोधात उमेदवार दिला आहे. परळीतून धनंजय मुंडे यांच्या विरोधात मनसेचे अभिजित देशमुख निवडणूक लढवणार आहेत.
मनसेच्या तिसऱ्या यादीत कुणाला स्थान?
1. पप्पू उर्फ मंगेश पाटील – अमरावती
2. दिनकर धर्माजी पाटील-नाशिक पश्चिम
3. डॉ.नरसिंग भिकाणे – अहमदपूर-चाकूर
4.अभिजित देशमुख – परळी
5.सचिन रामू शिंगडा – विक्रमगड
6.वनिता शशिंकात कथुरे- भिवंडी ग्रामीण
7.नरेश कोरडा-पालघर
8.आत्माराम प्रधान- शहादा
9.स्नेहल सुधीर जाधव- वडाळा
10. प्रदीप वाघमारे – कुर्ला
11.संदीप पाचंगे-ओवळा माजिवाडा
12.सुरेश चौधरी -गोंदिया
13.अश्विन जयस्वाल -पुसद
आगामी विधानसभा २०२४ च्या सार्वत्रिक निवडणुकांसाठी , महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची तिसरी यादी खालीलप्रमाणे….#MNSAdhikrut #विधानसभा_२०२४ pic.twitter.com/97ZRgOmc4u
— MNS Adhikrut – मनसे अधिकृत (@mnsadhikrut) October 23, 2024
यावेळी मनसेकडून विधानसभेची जोरदार तयारी करण्यात आली आहे. राज ठाकरेंनी सुरुवातीलाच यंदाची निवडणू स्वबळावर लढवणार असल्याची घोषणा केली होती. मनसेने पहिल्यांदा ७ उमेदवारांच्या नावांची घोषणा केली होती. त्यानंतर मंगळवारी मनसेकडून ४५ उमेदवारांच्या नावांची घोषणा करण्यात आली आहे. तर आज आणखी १३ उमेदवारांची नावे जाहीर केली आहेत. आतापर्यंत मनसेने एकूण ६५ उमेदवारांना निवडणुकीच्या मैदानात उतरवले आहे.