Maharashtra Assembly Elections 2024 : महाराष्ट्रातील निवडणुक (Maharashtra Assembly Elections 2024) आता तोंडावर येऊन ठेपली आहे. अशातच राज्यात राजकीय घडामोडींना वेग आला आहे. अनेक पक्षांकडून त्यांच्या उमेदवारांची यादी जाहीर होण्यास सुरुवात झाली आहे. याचदरम्यान, महायुतीतील सर्वच पक्षांनी आपली पहिली तसेच दुसरी यादी जाहीर केली आहे.
दरम्यान, नुकतीच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने आपली दुसरी यादी जाहीर केली असून, या यादीत राष्ट्रवादीने पोर्शे कार अपघातात प्रकाशझोतात आलेले आमदार सुनिल टिंगरे यांना उमेदवारी जाहीर केली आहे.
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे दिवंगत नेते बाबा सिद्दिकी यांचे सुपुत्र आमदार झिशान सिद्दिकी यांच्या पक्ष प्रवेशाचा कार्यक्रम पार पडला. आपल्या वडिलांचा लोकसेवेचा, समाजसेवेचा वारसा झिशान हे नेटानं पुढे नेतील, असा विश्वास आहे. मी त्यांचं मनापासून स्वागत करतो आणि पुढील यशस्वी… pic.twitter.com/cspmBAc1iO
— Ajit Pawar (@AjitPawarSpeaks) October 25, 2024
तर दुसरीकडे बाबा सिद्दीकी यांचा मुलगा झिशान सिद्दीकी याला देखील उमेदवारी दिली आहे. झिशान सिद्दीकीने अखेर अजित पवार यांच्या नेतृत्वात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केला आहे. झिशान सिद्दिकी यांना वांद्रे पूर्व येथून उमेदवारी देण्यात आली आहे. अजित पवारांनी दुसऱ्या यादीत सात उमेदवारांची घोषणा केली आहे.
राष्ट्रवादीची 7 उमेदवारांची दुसरी यादी जाहीर :-
निशिकांत पाटील : इस्लामपूर
संजय काका पाटील : तासगाव
झिशान सिद्दिकी : वांद्रे पूर्व
प्रताप चिखलीकर : लोहा कंधार
सना मलिक : अनुशक्ती नगर
सुनील टिंगरे : वडगाव शेरी
ज्ञानेश्वर कटके : शिरूर हवेली