Pune News : राज्यात विधानसभा निवडणुकीचे (Maharashtra Assembly Elections) बिगुल वाजले असून, राज्यातील राजकारण तापले आहे. याचदरम्यान पुणे पोलिसांकडून मोठी कारवाई करण्यात आली आहे. सध्या विधानसभेच्या पार्श्वभूमीवर पोलिसांकडून वाहनांची तपासणी केली जात आहेत. तसेच भरारी पथकेही तैनात करण्यात आली आहेत. काही दिवसांपूर्वी पुण्यात पोलिसांनी एक गाडी अडवली असता, त्यात कोट्यवींची रोकड सापडली होती. विरोधकांनी ही रोकड निवडणुकांच्या कामासाठीच असल्याचा आरोप केला होता.
आज पुण्यात सहकार नगर पोलीस स्टेशनच्या हद्दीत पुणे पोलिसांच्या नाकाबंदीत 138 कोटींचे सोने पकडले आहे. आज सकाळी ही कारवाई करण्यात आली असून, सातारा रस्त्यावर आज सकाळच्या सुमारास नाकाबंदी पोलिसांनी कोट्यवधीचे सोने जप्त केले आहे. या प्रकरणाचा पोलीस पुढे तपास करत आहेत.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सकाळी ८ वाजण्याच्या सुमारास पोलिसांनी हा टेम्पो अडवला होता. त्यामध्ये पांढऱ्या पोत्यात बॉक्स आढळले, टेम्पोमध्ये चालक आणि आणखी एक जण होता, त्यांची सध्या चौकशी सुरु आहे, पोलिसांनी केलेल्या या कारवाईत जवळपास १३८ कोटी रूपयांचे सोने असल्याची माहिती समोर आली आहे.
पुणे पोलिसांनी हा टेम्पो आज नाकाबंदी दरम्यान एक पकडला आहे. सहकार नगर परिसरातून ताब्यात घेतलेला हा टेम्पो एका खासगी लॉजिस्टिक कंपनीचा असून यामधील सोने पुण्यातील कुठल्या व्यापाऱ्याकडे जात होते, याचा तपास सध्या पुणे पोलिसांकडून सुरु आहे.