Devendra Fadnavis : राज्यामध्ये विधानसभा निवडणुकीचे बिगुल आता वाजले असून, राजकारण चांगलेच रंगले आहे. येत्या 20 नोव्हेंबर रोजी विधानसभा निवडणुकीसाठी मतदान होणार असून, पक्षांकडून उमेदवार जाहीर केले जात आहेत. तर दुसरीकडे उमेदवार देखील अर्ज दाखल करत आहेत.
अनेक बड्या नेत्यांनी कालपासून उमेदवारी अर्ज दाखल करण्यास सुरुवात केली आहे. दरम्यान आज भाजपचे नेते देवेंद्र फडणवीस यांनी देखील नागपूर दक्षिण पश्चिम मतदारसंघातून उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. अर्ज दाखल करण्यापूर्वी फडणवीसांनी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या निवासस्थानी जाऊन त्यांची भेट घेतली. त्यानंतर त्यांनी जोरदार शक्तिप्रदर्शनही केले.
अर्ज दाखल केल्यानंतर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रसार माध्यमांशीही संवाद साधला. यावेळी फडणवीस म्हणाले, “भारतीय जनता पक्षाचे, पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शाह या सगळ्यांचे मी आभार मानतो. मला सहाव्यांदा विधानसभेची उमेदवारी दिली. मी माझा उमेदवारी अर्ज भरला आहे. मला पूर्ण विश्वास आहे की सभागृहाचा सदस्य म्हणून जनतेने माझं काम पाहिलं आणि सेवाही पाहिलं आहे. आता एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वात जे सरकार आहे तेच पुन्हा सत्तेवर येईल हा माझा विश्वास आहे.”
#WATCH | Nagpur | Maharashtra Deputy CM & BJP candidate from Nagpur South-West Assembly seat, Devendra Fadnavis says, "I express my gratitude to PM Modi, Union HM Amit Shah, party's national president JP Nadda and Union minister Nitin Gadkari for showing trust in me and given me… pic.twitter.com/moi8VKfgsl
— ANI (@ANI) October 25, 2024
पुढे त्यांनी महाराष्ट्रात महायुतीचे सरकार पुन्हा येईल अशा विश्वास देखील व्यक्त केला आहे. पुढे बोलताना फडणवीस म्हणाले, लोकांनी आमचे काम पाहिले आहे. तसेच नागपूरमधल्याही सगळ्याच्या सगळ्या जागा आम्ही जिंकू असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.