Lawrence Bishnoi : गँगस्टर लॉरेन्स बिश्नोई (Lawrence Bishnoi) मुलाखत प्रकरणी पंजाब सरकारने मोठी कारवाई केली आहे. भगवंत मान (Bhagwant Mann) सरकारने माजी डीएसपी गुरशेर सिंग संधू आणि इतर सहा पोलिस अधिकाऱ्यांना निलंबित केले आहे. 3 एप्रिल 2022 रोजी गँगस्टर लॉरेन्स बिश्नोईची मुलाखत आयोजित केल्याप्रकरणी सात अधिकारी दोषी आढळले आहेत. लॉरेन्स बिश्नोई सीआयए पोलिस स्टेशन, खररच्या ताब्यात असताना ही मुलाखत घेण्यात आली होती.
निलंबित अधिकाऱ्यांची नावे
1. समर वनीत, पीपीएस, डीएसपी
2. उपनिरीक्षक रीना, CIA, खरार
3. उपनिरीक्षक (एलआर) जगतपाल जंगू, एजीटीएफ
4. सब इन्स्पेक्टर (एलआर) शगनजीत सिंग
5. ASI मुखतियार सिंग
6. HC (LR) ओम प्रकाश
7. समर वनीत, पीपीएस, डीएसपी
दीड वर्षांपूर्वीचे प्रकरण
दीड वर्षांपूर्वी गँगस्टर लॉरेन्स बिश्नोईने एका राष्ट्रीय वाहिनीला दिलेली मुलाखत व्हायरल झाली होती. या घटनेनंतर पंजाब पोलिसांना टीकेला सामोरे जावे लागले होते. पंजाब पोलिसांच्या वतीने लॉरेन्सची ही मुलाखत पंजाबच्या तुरुंगातील नसल्याचे सांगण्यात आले होते. यानंतर पंजाब आणि हरियाणा उच्च न्यायालयाने 10 महिन्यांपूर्वी त्या मुलाखतीची चौकशी करण्यासाठी एसआयटीची स्थापना केली होती. ज्याचा अहवाल डीजीपी प्रबोध कुमार यांनी मंगळवारी उच्च न्यायालयात सादर केला आहे.
या प्रकरणाचा तपास केल्यानंतर एसआयटी प्रमुख प्रबोध कुमार म्हणाले होते की, ‘तपास अहवाल आता पंजाब सरकारला देण्यात आला आहे. या अहवालानुसार आता सरकारला यावर कारवाई करायची आहे. यावर पंजाब सरकारने सांगितले की, ‘दहा दिवसांत आरोपी आणि अधिकाऱ्यांवर कारवाई केली जाईल.’
लॉरेन्स बिश्नोईची मुलाखत व्हायरल झाल्यानंतर पंजाब पोलिस अडचणीत सापडले होते, कारण लॉरेन्स त्यावेळी पंजाब तुरुंगातच होता. सध्या लॉरेन्स गुजरातमधील साबरमती तुरुंगात आहे.