Cyclone Dana : दाना चक्रीवादळामुळे ओडिशा आणि पश्चिम बंगालमध्ये मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. अनेक भागात जोरदार पाऊस आणि सोसाट्याचा वारा सुरू आहे. पश्चिम बंगालमध्ये चक्रीवादळामुळे आतापर्यंत चार जणांचा मृत्यू झाला आहे.
दरम्यान, ओडिशाचे मुख्यमंत्री मोहन चरण माझी यांनी सांगितले की, ‘नुकसानग्रस्त भागातून एकूण 5,84,888 लोकांना सुरक्षित स्थळी हलवण्यात आले आहे. या लोकांना सध्या 6,008 चक्रीवादळ निवारागृहात ठेवण्यात आले आहे. जिथे त्यांना अन्न, पाणी आणि औषधे आणि इतर आवश्यक वस्तू पुरवल्या जात आहेत. दरम्यान, ओडिशा सरकारने ‘दाना’ चक्रीवादळ संबंधित कामात आणि कर्तव्यात कसूर केल्याबद्दल आणि लोकांशी गैरवर्तन केल्याबद्दल चार अधिकाऱ्यांना निलंबित केले आहे.
सीएम माझी यांनी माहिती दिली आहे की, ‘4431 गरोदर महिलांना मदत शिबिरांमध्ये हलवण्यात आले आहे, त्यापैकी 1600 महिलांनी मुलांना जन्म दिला आहे. माहिती देताना मुख्यमंत्री कार्यालयाने सांगितले आहे की, ‘4431 गरोदर महिलांपैकी 1600 महिलांनी मुलाला जन्म दिला आहे. आई आणि मूल दोघेही सुरक्षित आहेत. परिस्थितीवर 24 तास लक्ष ठेवले जात आहे. भगवान जगन्नाथाच्या कृपेने आम्ही चक्रीवादळावर यशस्वीपणे नियंत्रण मिळवले आहे.’
10 लाख लोकांना वाचवण्याचे लक्ष्य
सीएम मोझी म्हणाले की, ‘बालासोर जिल्ह्यात सर्वाधिक लोकांची सुटका करण्यात आली आहे. या भागातील 1,72,916 लोकांना मदत छावण्यांमध्ये हलवण्यात आले आहे. याशिवाय मयूरभंजमधील 100,000 लोकांना सुरक्षित स्थळी पाठवण्यात आले आहे. भद्रकमधून 75,000, जाजपूरमधून 58,000 आणि केंद्रपारा येथून 46,000 लोकांना वाचवण्यात आले आहे. ते म्हणाले की, राज्य सरकारने 10 लाख लोकांना स्थलांतरित करण्याचे लक्ष्य ठेवले आहे. सीएम माझी म्हणाले, आम्ही जवळजवळ सर्वांना जोखीम क्षेत्रातून बाहेर काढले आहे.’
मुख्यमंत्री मोहन चरण मोझी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शहा यांना चक्रीवादळ ‘दाना’साठी राज्याच्या तयारीची माहिती दिली आहे. राज्य सरकारने राबविलेल्या उपाययोजनांवर त्यांनी समाधान व्यक्त केले आहे.
१.७५ लाख एकर जमिनीतील पिकांचे नुकसान
पश्चिम बंगालमध्ये दाना चक्रीवादळामुळे शुक्रवारी सकाळी 12.05 च्या सुमारास ओडिशातील केंद्रपारा येथील भितरकनिका आणि भद्रक जिल्ह्यातील धामरा दरम्यान सुमारे 110 किमी प्रतितास वेगाने वारे वाहत होते. या काळात भूस्खलनाच्याही घटना घडल्या आहेत.
दाना चक्रीवादळ आणि पावसामुळे 1.75 लाख एकर जमिनीवर उगवलेली पिके नष्ट झाललेली आहेत. कृषी आणि शेतकरी सक्षमीकरण विभागाच्या प्रधान सचिव अरबिंदा पाधी यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म X वर माहिती देत सांगितले आहे की, “प्राथमिक अहवालानुसार, ‘दाना चक्रीवादळामुळे 1,75,000 एकर (69,995 हेक्टर) जमिनीवरील पिके नष्ट होण्याची शक्यता आहे. अंदाजे 2,80,000 एकर (1,12,310 हेक्टर) जमिनीवर उगवलेली पिके पाण्याखाली गेल्याचा संशय आहे.”