Sharad Pawar : विधानसभा निवडणुकीसाठी (Maharashtra Assembly Election) महाविकास आघाडीमध्ये जागावाटपाचा तिढा आता सुटल्याचे चित्र दिसत आहेत. शिवसेने (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पाठोपाठ आता शरदचंद्र पवार राष्ट्रवादी गटाकडूनही दुसरी यादी जाहीर करण्यात आली आहे.
शरद पवार गटाने दोन दिवसांपूर्वी पहिली यादी जाहीर केल्यानंतर आज (शनिवारी) दुसरी यादी जाहीर केली आहे. आज 22 उमेदवारांच्या नावाची घोषणा करण्यात आली आहे. तर याआधी 45 उमेदवार जाहीर केले होते. आता एकूण 65 उमेदवारांच्या नावाची घोषणा करण्यात आली आहे. जयंत पाटील यांनी आज मुंबईमध्ये आयोजित पत्रकार परिषदेमधून २२ नावांची घोषणा केली आहे.
आज जाहीर केलेल्या दुसऱ्या यादीत पुण्यातील दोन ते तीन जागासंदर्भात उमेदवारांची घोषणा केली आहे. यात खडकवासला मतदारसंघातून सचिन दोडके यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. तर पर्वती विधानसभा मतदारसंघातून अश्विनी कदम यांच्यावरून पुन्हा विश्वास ठेवला आहे. परंडा मतदारसंघातून राहुल परांडे यांना शरद पवार गटाने उमेदवारी दिली आहे. दिंडोरी विधानसभा मतदारसंघातून अशीच वर गटातील नरहरी झिरवळ यांच्या विरोधात त्यांचे पुत्र गोकुळ झिरवाळ यांचं नाव चर्चेत होतं. मात्र आज जयंत पाटील यांनी नरहरी झिरवाळ यांच्या विरोधात सुनीता सारसकर यांना उमेदवारी दिली आहे. त्यामुळे आता गोकुळ झिरवाळ पुढे काय भूमिका घेणार ? हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.
दुसऱ्या बाजूला बीडमधून संदीप क्षीरसागर यांना पुन्हा विधानसभा निवडणुकीसाठी उमेदवारी देण्यात आली आहे. अकोले विधानसभा मतदारसंघातून अमित भांगरे या नव्या चेहऱ्याला संधी देण्यात आली आहे नाशिक जिल्ह्यातील बागलाण विधानसभा मतदारसंघातून दीपिका चव्हाण यांना शरद पवार गटाने उमेदवारी दिली आहे. तर अजित पवार गटातील मंत्री छगन भुजबळ यांच्या विरोधात माणिकराव शिंदे यांना निवडणुकीच्या रिंगणात उभ केले आहे. त्यातच एरंडोल विधानसभा मतदारसंघातून सतीश पाटील तर गंगापूर विधानसभा मतदारसंघातून उमेदवारी दिली आहे.
यातच आर्वी विधानसभा मतदारसंघातून मयूर काळे या निवडणुकीच्या रिंगणात उभे राहणार आहे. जुन्नर विधानसभा मतदारसंघातून सत्यशिल शेरकर यांना आज शरद पवार गटाकडून उमेदवारी जाहीर झाली आहे. या ठिकाणी त्यांचा सामना अजित पवार गटातील विद्यमान आमदार अतुल बेनके यांस यांच्या सोबत होणार आहे. पिंपरी विधानसभा मतदारसंघात सुलक्षणा शीलवंत धस यांना शरद पवार गटाने उमेदवारी दिली आहे. त्यांचा सामना अजित पवार गटातील विद्यमान आमदार अण्णा बनसोडे यांच्या सोबत होणार आहे.
1. 16 एरंडोल – सतीश पाटील
2. 111 गंगापूर- सतीश चव्हाण
3. 135 शहापूर- पांडुरंग बरोरा
4. 243 परांडा- राहुल मोटे
5. 230 बीड- संदीप क्षीरसागर
6. 44 आर्वी- मयुरा काळे
7. 116 बागलान- दीपिका चव्हाण
8. 119 येवला- माणिकराव शिंदे
9. 120 सिन्नर- उदय सांगळे
10. 122 दिंडोरी- सुनीता चारोस्कर
11. 123 नाशिक- पूर्व गणेश गीते
12. 141 उल्हासनगर- ओमी कलानी
13. 195 जुन्नर- सत्यशील शेरकर
14. 206 पिंपरी- सुलक्षणा शीलवंत
15. 211 खडकवासला- सचिन दोडके
16. 212 पर्वती- अश्विनीताई कदम
17. 216 अकोले- अमित भांगरे
18. 225 अहिल्यानगर शहर- अभिषेक कळमकर
19. 254 माळशिरस- उत्तमराव जानकर
20. 255 फलटण- दीपक चव्हाण
21. 271 चंदगड- नंदिनीताई भाबुळकर कुपेकर
22. 279 इचलकरंजी- मदन कारंडे