Assembly Elections : महाविकास आघाडीतील शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाची दुसरी यादी जाहीर करण्यात आली आहे. आज दुपारी पक्षाने १५ उमेदवारांच्या नावाची घोषणा केली आहे.
महाविकास आघाडीच्या जगावाटपात तिढा सुटलेला दिसत आहेत. महाविकास आघाडीतील सर्वच पक्षांनी आपल्या उमेदवारांची यादी जाहीर केली आहे. याआधी काँग्रेस नंतर शरदचंद्र पवार राष्ट्रवादी गटाकडूनही दुसरी यादी जाहीर करण्यात आली आहे.
शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या पक्षाने आज दुपारी १५ उमेदवारांची दुसरी यादी जाहीर केली होती, यानंतर आता आणखी तीन उमेदवार जाहीर करण्यात आले आहेत. सुरूवातीला ठाकरेंच्या पक्षाने ६५ उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली त्यानंतर आता १८ नवे उमेदवार जाहीर करण्यात आले आहेत.
माननीय शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षप्रमुख मा. श्री. उद्धवसाहेब ठाकरे ह्यांच्या आदेशाने महाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०२४ करिता शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे आणखी तीन अधिकृत उमेदवारांची यादी जाहिर करण्यात आली आहे.
१६४ वर्सोवा – हरुन खान
१६९ घाटकोपर पश्चिम – संजय…— ShivSena – शिवसेना Uddhav Balasaheb Thackeray (@ShivSenaUBT_) October 26, 2024
शिवसेना दुसऱ्या यादीतील उमेदवार
-धुळे शहर- अनिल गोटे
-चोपडा (अज) – राजू तडवी
-जळगाव शहर- जयश्री सुनील महाजन
-बुलढाणा- जयश्री शेळके
-दिग्रस- पवन श्यामलाल जयस्वाल
-हिंगोली- रूपाली राजेश पाटील
-परतूर- आसाराम बोराडे
-देवळाली (अजा) – योगेश घोलप
-कल्याण पश्चिम- सचिन बासरे
-कल्याण पूर्व – धनंजय बोडारे
-वडाळा- श्रद्धा श्रीधर जाधव
-शिवडी- अजय चौधरी
-भायखळा- मनोज जामसुतकर
-श्रीगोंदा – अनुराधा राजेंद्र नागावडे.
-कणकवली- संदेश भास्कर पारकर
-शिवसेनेच्या तिसऱ्या यादीतील उमेदवार
-१६४ वर्सोवा – हरुन खान
-१६९ घाटकोपर पश्चिम – संजय भालेराव
-१६७ विलेपार्ले – संदिप नाईक