Thalapathy Vijay TVK Political Party : तामिळ सुपरस्टार थलपती विजय यांनी (Thalapathy vijay) तमिलगा वेत्री कझगम (टीवीके) या राजकिय पक्षाची स्थापना केली असून राज्याच्या राजकारणात दमदार एन्ट्री घेतली आहे. थलपथी विजय यांनी राजकारणात पाऊल ठेवल्यानंतर पहिल्यांदाच भाषण केले आहे. त्यांच्या पहिल्या भाषणाला लाखोंनी गर्दी होती, तसेच चाहत्यांमध्ये त्यांच्या भाषणानंतर मोठ्या प्रमाणात उत्साह पाहायला मिळाला आहे.
तमिलगा वेत्री कझगम (Tamilaga Vettri Kazhagam) पक्षाची ही पहिलीच सभा असून, यामध्ये थलपती विजय यांनी त्यांच्या भाषणाने सर्वांच्या मनावर एक वेगळी छाप पाडली आहे. काल (रविवारी) ही सभा पार पडली आहे.
तामिळनाडूच्या विल्लुपुरम जिल्ह्यातील विक्करवंडी येथे आयोजित सभेत मोठ्या प्रमाणात गोंधळ उडाला होता. यावेळी लाखो चाहते विजय यांना पाहण्यासाठी आणि ऐकण्यासाठी जमले होते.
6,000 पोलीस कर्मचारी तैनात
अहवालानुसार, या सभेला 2,00,000 लोक उपस्थित होते. यावेळी कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी तामिळनाडूच्या गृहविभागाने कार्यक्रमस्थळी 6,000 पोलीस अधिकारी तैनात केले होते.
थलपथी विजय यांनी यावेळी तमिलगा वेत्री कझगमच्या पहिल्या राज्य सभेत पक्षाचा अजेंडा आणि धोरणांवर चर्चा केली आहे. थलपथी विजय यांचा हा कार्यक्रम 85 एकर परिसरात आयोजित करण्यात आला होता. ज्यामध्ये पार्किंगसाठी 207 एकर अतिरिक्त जागा निश्चित करण्यात आली होती.
2026 கூட்டணி ஆட்சிக்கு, ஆட்சியில் பங்கு,
அதிகார பகிர்வு.
திரு, திருமாவளவன் அவர்களே@thirumaofficial, அண்ணன் திரு. சீமான் @SeemanOfficial @Seeman4TN அவர்களே வாருங்கள் ஒன்றிணைவோம் ஊழல் அற்ற புதியதோர் தமிழகத்தை உருவாக்குவோம்…💐💐💐#தமிழகவெற்றிக்கழகம் #தமிழகவெற்றிக்கழகம்மாநாடு… pic.twitter.com/QmyJVq5JCQ— தமிழக வெற்றிக் கழகம் (செய்திகள்) (@TVK_CbeNorth) October 27, 2024
2026 च्या विधानसभा निवडणुकांवर लक्ष्य
सभेला उपस्थित मदुराई येथील आयटी व्यावसायिक उदयकुमार यांनी सांगितले की, ‘विजय यांचा राजकारणात प्रवेश तामिळनाडू आणि तेथील लोकांसाठी चांगला आहे. राजकारणात येण्यापूर्वी त्यांनी काळजीपूर्वक अभ्यास केला असून 2026 च्या विधानसभा निवडणुका हे त्यांचे लक्ष्य आहे. मला आशा आहे की ते तामिळनाडूचे पुढील मुख्यमंत्री होतील.’ असा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला आहे.