Maharashtra Assembly Election 2024 : महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीसाठी भाजपने (Maharashtra Assembly Election 2024) त्यांच्या उमेदवारांची तिसरी यादी जाहीर केली आहे. यामध्ये पक्षाने 25 उमेदवारांची नावे जाहीर केली आहेत. वर्सोव्यातुन भारती लव्हेकरांना उमेदवारी देण्यात आली आहे. तसेच अनेक विद्यमान आमदारांना त्याच मतदारसंघातून पुन्हा संधी देण्यात आली आहे. तर लातूरमधून अर्चना चाकूरकर यांना उमेदवारी देण्यात आली आहे.
दरम्यान, विधानसभेसाठी उमेदवारी अर्ज भरण्यास एकच दिवस शिल्लक असून, अनेक बडे नेते आजच आपला अर्ज भरत आहेत. विधानसभेसाठी उमेदवारी अर्ज भरण्याची शेवटची तारीख 29 ऑक्टोबर आहे. अर्ज भरण्यासाठी आत खूप कमी वेळ शिल्लक राहिला असता राजकीय घडामोडींना वेग आल्याचे दिसत आहे.
आज राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उमेदवारी अर्ज भरला असून, उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी देखील बारामतीतून आपला उमेदवारी अर्ज दाखल केला आहे.
भाजपची तिसरी यादी :-
बोरिवली – संजय उपाध्याय
घाटकोपर पूर्व – पराग शहा
वसई – स्नेहा दुबे
साकोली – अविनाश ब्राह्मणकर
वर्सोवा – भारती लवेकर
आहुती – सुरेश धस
देगलूर – जितेश अंतापूरकर
चंद्रपूर – किशोर जोरगेवार
माळशिरस – राम सातपुते
महायुतीतील उमेदवारांच्या यादीबद्दल बोलायचे झाल्यास भाजपने आतापर्यंत तीन याद्या जाहीर केल्या आहेत. तर महायुतीत शिवसेना शिंदे गटाकडून एकूण दोन याद्या जाहीर करण्यात आल्या आहेत. तर राष्ट्रवादी अजित पवार गटाकडून तीन याद्या जाहीर करण्यात आल्या आहेत.
भाजपकडून पहिल्या यादीत सर्वाधिक 99 उमेदवारांची घोषणा करण्यात आली होती. तर दुसऱ्या यादीमध्ये 22 उमेदवारांच्या नावाची घोषणा करण्यात आली आहे. आणि आज तिसऱ्या यादीत 25 उमेदवारांच्या नावाची घोषणा करण्यात आली आहे. भाजपने आतापर्यंत एकूण 146 उमेदवारांच्या नावाची घोषणा केली आहे.