Nanded Lok Sabha by Election 2024 : नांदेड लोकसभा जागेसाठी 20 नोव्हेंबर रोजी पोट निवडणूक होणार आहे. तर 23 नोव्हेंबरला निवडणुकीचा निकाल जाहीर होणार आहे. भारतीय निवडणूक आयोगाने महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीसोबतच पोटनिवडणूक होणार असल्याची माहिती दिली आहे. राज्यात 20 नोव्हेंबरला विधानसभेच्या 288 जागांवर एकाच टप्यात मतदान होणार आहे.
नुकत्याच पार पडलेल्या लोकसभा निवडणुकीत काँग्रेसने नांदेडची जागा जिंकली होती. पण, काँग्रेस खासदार वसंत चव्हाण यांच्या अकाली निधनामुळे या ठिकाणी पोट निवडणूक होत आहे. वसंतराव बळवंतराव चव्हाण यांच्या निधनाने नांदेडची जागा रिक्त झाली आहे. 26 ऑगस्ट रोजी वसंतराव यांचे दीर्घ आजाराने निधन झाले होते.
BJP fields Santuk Marotrao Hambarde as its candidate for Nanded Lok Sabha by-election. pic.twitter.com/8JsXDnxXof
— ANI (@ANI) October 28, 2024
नांदेड लोकसभा पोट निवडणुकीसाठी काँग्रेसने आधीच उमेदवारी जाहीर केली होती. काँग्रेसने वसंत चव्हाण यांचे पूत्र रवींद्र चव्हाण यांना उमेदवारी जाहीर केली आहे. तर, दुसरीकडे भाजपने देखील नांदेडसाठी उमेदवार जाहीर केला आहे.
भाजपने नांदेड दक्षिण ग्रामीण जिल्हाध्यक्ष डॉ. संतुक हंबर्डे यांना उमेदवारी जाहीर केली आहे. संतुक हंबर्डे हे नांदेड दक्षिण मतदारसंघाचे काँग्रेस आमदार मोहन हंबर्डे यांचे संख्ये भाऊ आहेत.