Volodymyr Zelenskyy : युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष वोलोडिमिर झेलेन्स्की (Volodymyr Zelenskyy) यांनी रशियासोबत सुरू असलेल्या युद्धादरम्यान भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडून मदत मागितली आहे. भारतातील एका प्रसिद्ध माध्यमाला दिलेल्या मुलाखतीत त्यांनी मोदींचे कौतुक करत म्हंटले की, ‘पीएम मोदी दोन्ही देशांमधले युद्ध थांबवू शकतात.’ यावेळी त्यांनी भारताच्या पंतप्रधानांनी रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांच्याशी संपर्क साधावा असे आवाहनही केले आहे.
तसेच रशियातून ‘1000 युक्रेनियन मुलांना’ युक्रेनमध्ये परत आणण्यासाठी मोदींनी मदत करावी अशी इच्छा देखील त्यांनी यावेळी व्यक्त आहे.
मुलाखतीदरम्यान झेलेन्स्की म्हणाले की, ‘पीएम मोदी युक्रेन आणि रशिया या दोन्ही देशांमध्ये सुरु असलेले युद्ध थांबवू शकतात. या देशांमध्ये सुरु असलेल्या संघर्षात त्यांचे मोठे महत्त्व आहे. भारत या युद्धात महत्वाची भूमिका बजावू शकतो.’ असे देखील त्यांनी यावेळी म्हंटले आहे.
खरं तर, पीएम मोदी हे जगातील एकमेव नेते आहेत ज्यांनी युद्धाच्या काळात रशिया आणि युक्रेन या दोन्ही देशांना भेट दिली आहे. भारत शांततेचा संदेश देतो आणि संवादातूनच मार्ग काढतो असे पंतप्रधान मोदींनी स्पष्टपणे सांगितले आहे.
युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष वोलोडिमिर झेलेन्स्की यांनी कबूल केले आहे की, ‘पीएम मोदी युक्रेन आणि रशिया यांच्यात चर्चा आयोजित करू शकतात, हे भारतात होऊ शकते आणि पीएम मोदी युद्ध संपवू शकतात यात शंका नाही. पण मला वाटतं की, हे आपण स्वत: केले पाहिजे आणि तेही आपापल्या परीने, कारण युद्ध आपल्या मातीवर होत आहे.’
युक्रेनमध्ये शांतता प्रस्थापित करण्यासाठी भारत काम करण्यास तयार आहे या पंतप्रधान मोदींच्या वक्तव्यावर झेलेन्स्की म्हणाले की, ‘आम्ही शांतता प्रस्थापित करण्यासाठी काम करण्यास तयार आहोत हे भारताचे विधान पुरेसे नाही. भारताची कृतीही पाहिली पाहिजे. पीएम मोदी हे खरे तर एका मोठ्या देशाचे पंतप्रधान आहेत…असा देश आम्हाला युद्ध संपवण्यात रस आहे असे म्हणू शकत नाही. पीएम मोदी युद्ध संपवण्यात मोठी भूमिका बजावू शकतात.’ असे युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष वोलोडिमिर झेलेन्स्की म्हणाले आहेत.
तुमच्या माहितीसाठी रशिया आणि युक्रेन या दोन्ही देशांनी सहमती दर्शवली आहे की, भारत दोघांमध्ये सुरू असलेले युद्ध संपवू शकतो.