राष्ट्रवादी शरद पवार गटाची चौथी यादी नुकतीच जाहीर करण्यात आली आहे. त्यामध्ये एकूण सात उमेदवारांच्या नावाचा समावेश आहे. पैकी माण विधानसभा मतदार संघातून प्रभाकर घारगे, काटोल विधानसभा मतदार संघातून सलील अनिल देशमुख, खानापुर विधानसभा मतदार संघातून वैभव सदाशिव पाटील, वाई विधानसभा मतदार संघातून श्रीमती अरुणादेवी पिसाळ, दौंड विधानसभा मतदार संघातून रमेश थोरात, पुसद विधानसभा मतदार संघातून शरद मैद तर शिंदखेडा विधानसभा मतदार संघातून संदीप बेडसे यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे.
एकंदरीत महाविकास आघाडीकडून ९५ – ९५ – ९५ च्या फॉरमूल्यानंतर कॉँग्रेस, उबाठा आणि राष्ट्रवादी शरद पवार गटाकडून उमेदवारी जाहीर करण्यात येत आहेत. नुकतीच त्यांची ७ उमेदवारांची यादी जाहीर झाली असून त्यात सलील देशमुख हे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांचे सुपुत्र आहेत. तर संदीप बेडसे हे मुंबई महानगर पालिकेत बांधकाम विभागात इंजिनियर राहिले आहेत. तसेच छगन भुजबळ यांचे स्वीय सहाय्यक राहिले आहेत.
दरम्यान, उद्या उमेदवारी अर्ज दाखल करायची शेवटची तारीख आहे तर २० तारखेला मतदान होऊन २३ तारखेला मतमोजणी होणार आहे.