मुंबई : शिवसेनेचे (यूबीटी) उमेदवार किशनचंद तनवाणी यांनी महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत छत्रपती संभाजीनगर मध्य विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढवण्यास नकार दिला आहे. यामुळे शिवसेनेचे यूबीटी अध्यक्ष उद्धव ठाकरे यांना मोठा धक्का बसला आहे.
शिवसेनेने किशनचंद तनवाणी यांना छत्रपती संभाजीनगर मध्य विधानसभा मतदारसंघाचे उमेदवार केले होते. मात्र, तनवाणी यांनी पक्षाला तिकीट परत केले आहे. तनवाणी यांनी तिकीट का परत केले याचे कारण अद्याप समोर आलेले नाही. दुसरीकडे, छत्रपती संभाजीनगर मध्य मतदारसंघातून शिवसेनेच्या एकनाथ शिंदे यांच्या पक्षाकडून प्रदीप जैस्वाल यांना तिकीट मिळाले आहे.
2014 च्या निवडणुकीत किशनचंद तनवाणी आणि प्रदीप जैस्वाल या दोघांनीही या जागेवरून निवडणूक लढवली होती. तर एमआयएमचे इम्तियाज जलीलही पहिल्यांदाच येथून निवडणूक लढवत होते. या जागेवर तनवाणी आणि जैस्वाल यांच्यात हिंदू मतांची विभागणी झाली, त्यामुळे येथे एमआयएमचे इम्तियाज निवडून आले. यानंतर 2019 मध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीत प्रदीप जैस्वाल आणि किशनचंद तनवाणी यांच्यात निर्णय झाला की यावेळी जैस्वाल निवडणूक लढवतील आणि 2024 मध्ये किशन तनवाणी निवडणूक लढवतील. मात्र, ते आता ऐकत नसल्यामुळे निर्णय घेतला असल्याचे सांगितले जात आहे. पण त्यांच्या या निर्णयामुळे निवडणुकीच्या प्रक्रियेला गती येण्यापूर्वीच ठाकरे सेनेची एक जागा लढण्याअगोदरच हातून गेल्यात जमा आहे.
दरम्यान, जळगाव जिल्ह्यातील चोपडा विधानसभा मतदारसंघात शिवसेनेने सोमवारी अचानकपणे उमेदवार बदलला आहे. या जागेवर शिवसेनेने यापूर्वी राजू तडवी यांना उमेदवारी दिली होती, आता तडवींच्या जागी प्रभाकर सोनवणे यांना उमेदवारी देण्यात आली आहे.