NCP Sharad Pawar : राष्ट्रवादी शरद पवार गटाची (Sharad Pawar) पाचवी यादी नुकतीच जाहीर करण्यात आली आहे. या यादीत 5 उमेदवारांच्या नावांची घोषणा करण्यात आली आहे. पाचव्या यादीत माढा (Madha), मुलुंड (Mulund), मोर्शी (Morshi), पंढरपूर (Pandharpur), मोहोळ यांसारख्या महत्वाच्या जागांवर उमेदवारांची घोषणा करण्यात आली आहे.
शरद पवारांच्या राष्ट्रवादीने पाचव्या यादीत अभिजीत पाटील यांनी माढ्यातून उमेदवारी दिली आहे. तर राजू खरे याना मोहोळमधून निवडणुकीच्या मैदानावर उतरवण्यात आले आहे.
कृपया प्रसिद्धीसाठी…
राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी- शरदचंद्र पवार पक्षाच्या संसदीय मंडळाने दिलेल्या मान्यतेनुसार महाराष्ट्र विधानसभा निवडणूक – २०२४ साठी पक्षाच्या अधिकृत उमेदवारांची विधानसभानिहाय पाचवी यादी जाहीर करण्यात आली आहे. pic.twitter.com/6idD0OGYmw
— Nationalist Congress Party – Sharadchandra Pawar (@NCPspeaks) October 29, 2024
शरद पवार गटाची पाचवी यादी
अभिजीत पाटील – माढा
संगीता वाजे – मुलुंड
गिरीश कराळे – मोर्शी
अनिल सावंत – पंढरपूर
राजू खरे – मोहोळ
राष्ट्रवादी शरद पवार पक्षाने पहिल्या यादीत 45 उमेदवारांच्या नावाची घोषणा केली होती. त्यानंतर दुसऱ्या यादीत 22 उमेदवारांच्या नावांचा समावेश करण्यात आला. तर रविवारी तिसऱ्या यादीत 9 उमेदवारांच्या नावांची घोषणा करण्यात आली आणि त्यानंतर सोमवारी जाहीर केलेल्या यादीत 7 उमेदवारांची घोषणा करण्यात आली. आता पक्षाने आणखी 5 उमेदवारांचा यादी जाहीर केली आहे. आतापर्यंत शरद पवार गटाने एकूण 87 उमेदवार जाहीर केले आहेत.
दरम्यान, आज उमेदवारी अर्ज दाखल करायची शेवटची तारीख असून, २० नोव्हेंबरला मतदान होणार आहे तर २३ नोव्हेंबरला मतमोजणी होणार आहे.