Matthew Wade : भारतीय संघ पुढील महिन्यात ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर जाणार आहे. दोन्ही संघांमध्ये बॉर्डर गावस्कर ट्रॉफीचे (Border–Gavaskar Trophy) 5 सामने होणार आहेत. ऑस्ट्रेलिया संघाने घरच्या मैदानावर मागील दोन बॉर्डर गावस्कर ट्रॉफी गमावली आहे. अशा स्थितीत ऑस्ट्रेलिया संघ भारताकडून बदला घेण्यास उत्सुक आहे. तर दुसरीकडे, भारतीय संघाची नजर ऑस्ट्रेलियात कसोटी मालिका विजयाची हॅट्ट्रिक साधण्यावर आहे. मात्र, हा दौरा सुरू होण्यापूर्वीच ऑस्ट्रेलियाचा आघाडीचा यष्टीरक्षक फलंदाज मॅथ्यू वेडने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली आहे.
36 वर्षीय मॅथ्यू वेडने 2011 मध्ये ऑस्ट्रेलियाकडून पदार्पण केले होते. या वर्षीच्या टी-20 विश्वचषकात त्याने भारताविरुद्ध शेवटचा सामना खेळला होता. यष्टिरक्षक फलंदाज वेडला 2021 पासून वनडे आणि कसोटीत खेळण्याची संधी मिळाली नाही. 2021 च्या टी-20 विश्वचषकात ऑस्ट्रेलियाच्या विजयाच्या नायकांपैकी तो एक होता.
मॅथ्यू वेड पाकिस्तानविरुद्धच्या आगामी टी-20 मालिकेसाठी आंद्रे बोरोवेकच्या नेतृत्वाखाली ऑस्ट्रेलियाच्या प्रशिक्षकपदी रुजू होणार आहे. यासोबतच पुढील आठवड्यात मेलबर्न येथे सुरू होणाऱ्या वनडे मालिकेसाठीही तो कायम राहणार आहे. कोचिंगसोबतच वेड देशांतर्गत क्रिकेटही खेळणार आहे. तो तस्मानिया आणि बिग बॅश लीगसाठी होबार्ट हरिकेन्ससाठी किमान पुढील दोन हंगामांसाठी देशांतर्गत क्रिकेट खेळत राहणार आहे.
36 Test matches. 97 ODIs. 92 T20 Internationals.
Congratulations to Matthew Wade on an outstanding international cricket career! pic.twitter.com/SDWl1OhqZC
— Cricket Australia (@CricketAus) October 29, 2024
आंतरराष्ट्रीय कारकीर्द
मॅथ्यू वेडची आंतरराष्ट्रीय कारकीर्द 225 सामन्यांची होती. त्याने 36 कसोटीसह 97 एकदिवसीय आणि 92 टी-20 आंतरराष्ट्रीय सामने खेळले आहेत. त्याच्या कसोटीत त्याने 30 च्या सरासरीने 1613 धावा केल्या आहेत आणि यात 4 शतकांचाही समावेश आहे. शतकाच्या जोरावर वेडने एकदिवसीय सामन्यात 1867 धावा आणि टी-20 आंतरराष्ट्रीय सामन्यात 1202 धावा केल्या आहेत. त्याने 13 टी-20 सामन्यांमध्ये ऑस्ट्रेलियाचे नेतृत्वही केले आहे.