Maharashtra Election 2024 : काँग्रेसने (Indian National Congress) महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीसाठी स्टार प्रचारकांची यादी जाहीर केली आहे. काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे, सोनिया गांधी, राहुल गांधी, प्रियंका गांधी यांच्यासह अनेक बड्या नेत्यांची नावे या यादीत आहेत. या यादीत सचिन पायलट, कन्हैया कुमार आणि इम्रान प्रतापगढ़ी यांच्या नावांचा देखील समावेश करण्यात आला आहे.
काँग्रेसच्या 40 स्टार प्रचारकांच्या यादीत तेलंगणाचे मुख्यमंत्री रेवंत रेड्डी, कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या, उपमुख्यमंत्री डीके शिवकुमार, छत्तीसगडचे माजी मुख्यमंत्री भूपेश बघेल, राजस्थानचे माजी मुख्यमंत्री अशोक गेहलोत, पंजाबचे माजी मुख्यमंत्री चरणजीत सिंह चन्नी यांचीही नावे आहेत.
काँग्रेसची स्टार प्रचारकांची यादी
1. मल्लिकार्जुन खर्गे
2. सोनिया गांधी
3. राहुल गांधी
4. प्रियांका गांधी वाड्रा
5. केसी वेणुगोपाल
6. रमेश चेन्निथला
7. अशोक गेहलोत
8. मुकुल वासनिक
9. अविनाश पांडे
10. सिद्धरामय्या
11. भूपेश बघेल
12. रेवंत रेड्डी
13. चरणजित सिंग चन्नी
14. डीके शिवकुमार
15. सचिन पायलट
16. रणदीप सुरजेवाला
17. होय देव
18. खासदार पाटील
19. कन्हैया कुमार
20. इम्रान प्रतापगढ़ी
21.अलका लांबा
22. के जी जॉर्ज
23. के जयकुमार
24. जिग्नेश मेवाणी
25. नदीम जावेद
26. सलमान खुर्शीद
27.राजीव शुक्ला
28. नाना पटोले
29. बाळासाहेब थोरात
30. विजय वडेट्टीवार
31. पृथ्वीराज चव्हाण
32 चंद्रकांत हांडोरे
33. वर्षा गायकवाड
34. आरिफ नसीम खान
35. प्रणिती शिंदे
36. सतेज पाटील
37. विलास मुत्तेमवार
38.अशोक जगताप
39. अमित देशमुख
40. विश्वजीत कदम
‘या’ नेत्यांवर मोठी जबाबदारी
यापैकी अशोक गेहलोत, सचिन पायलट, चरणजित सिंग चन्नी आणि भूपेश बघेल यांचीही महाराष्ट्रातील विविध झोनचे वरिष्ठ निरीक्षक म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे, जे सातत्याने महाराष्ट्र दौरे करत आहेत आणि पक्षाच्या निवडणुकीच्या तयारीचा आढावा घेत आहेत. आणि सात्यत्याने बैठका घेत आहेत. महाराष्ट्रात २० नोव्हेंबरला मतदान होणार आहे. अशा स्थितीत पक्षांकडे निवडणूक प्रचारासाठी फक्त १८ नोव्हेंबर पर्यंत वेळ आहे.
त्याचवेळी निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज भरण्याची प्रक्रिया काल म्हणजेच २९ ऑक्टोबर रोजी पूर्ण झाली आहे. आता अर्जाची छाननी सुरु आहे. उमेदवारांना ३ नोव्हेंबर पर्यंत उमेदवारी अर्ज मागे घेता येणार आहे.