मुंबई : वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष ॲड. प्रकाश आंबेडकर यांना पुण्यातील एका रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. अचानक त्यांच्या छातीत दुखू लागल्याने त्यांना ताबडतोब रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. सध्या त्यांच्यावर आयसीयूमध्ये उपचार सुरू आहेत.
प्रकाश आंबेडकर यांच्या हृदयात रक्ताची गुठळी झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले आहे. अशापरिस्थितीत ताबडतोब त्यांच्यावर अँजिओग्राफी करण्यात आली आहे. सध्या त्यांची स्थिती स्थिर असून पुढील ३ ते ५ दिवस ते डॉक्टरांच्या निरीक्षणात राहणार असल्याची माहिती आहे.
Balasaheb Ambedkar was admitted to a hospital in Pune in the early hours of Thursday morning, October 31, for a chest pain.
Balasaheb Ambedkar is being treated at the ICU for a blood clot in his heart. 𝐇𝐢𝐬 𝐩𝐫𝐞𝐬𝐞𝐧𝐭 𝐜𝐨𝐧𝐝𝐢𝐭𝐢𝐨𝐧 𝐢𝐬 𝐬𝐭𝐚𝐛𝐥𝐞 and 𝐡𝐞 𝐰𝐢𝐥𝐥…
— Vanchit Bahujan Aaghadi (@VBAforIndia) October 31, 2024
यासंबंधीची माहिती वंचितने ट्विट करत दिली आहे. ‘पहाटेच्या सुमारास आंबेडकरांच्या छातीत दुखू लागले होते. यामुळे त्यांना पुण्यातील एका खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्यांच्या हृदयामध्ये रक्ताची गाठ आढळून आली आहे. यामुळे त्यांना आयसीयूमध्ये ठेवण्यात आले आहे. त्यांची प्रकृती स्थिर असून त्यांना पुढील काही तासांत अँजिओग्राफी केली जाणार आहे.’ असे ट्विट वंचितने केले आहे
दरम्यान, वंचित बहुजन आघाडीच्या प्रदेशाध्यक्षा रेखाताई ठाकूर, निवडणूक समन्वय समिती, जाहीरनामा समिती आणि माध्यम आणि संशोधन विभागाच्या सहकार्याने पुढील काही दिवस वंचित बहुजन आघाडीच्या प्रचाराचे नेतृत्व करणार आहेत. असेही वंचितने स्पष्ट केले आहे.