Israel Iran War : इराणने (Iran) इस्राईलवर (Israel) पुन्हा हल्ला करू नये अन्यथा इराणला मोठी किंमत चुकवावी लागले असा थेट अमेरिकेने दिला आहे. जर इराणने आता इस्राईलवर हल्ला केला तर इस्राईलला थांबवणे कठीण होईल असे वक्तव्य बायडेन प्रशासनाकडून (Joe Biden) आले आहे.
इराणने केलेल्या हल्ल्याला प्रत्युत्तर म्हणून नुकताच इस्राईलने इराणवर हवाई हल्ला केला आहे. त्यानंतर अमेरिकेकडून इराणला इशारा देण्यात आला आहे. इस्राईलने इराणची राजधानी तेहरानवर हल्ला केला होता. त्यानंतर शनिवारी इराणचे सर्वोच्च नेते अयातुल्ला अली खामेनी यांनी इस्राईल आणि अमेरिकेवर हल्ला करण्याची धमकी दिली होती. त्यानंतर अमेरिकेने इराणला इशारा दिला आहे.
अमेरिकेच्या एका वरिष्ठ अधकऱ्याने सांगितले आहे की, ‘जर इराणने पुन्हा एकदा इस्राईलवर हल्ला केला तर अमेरिका इराण विरोधी इस्राईलची प्रतिक्रिया रोखू शकणार नाही. असे विधान एका अमेरिकन अधिकाऱ्याने एका टीव्ही चॅनेलला दिलेल्या मुलाखतीत केले आहे.
इराणने पुन्हा दिली धमकी
अमेरिकेतून हे वक्तव्य येण्याच्या एक दिवस आधी शनिवारी इराणच्या सर्वोच्च नेत्याने पुन्हा एकदा इस्राईलवर हल्ला करण्याची धमकी दिली आहे. खामेनी म्हणाले की, इराणवर झालेल्या हल्ल्यानंतर इराण इस्राईल आणि त्यांच्या मित्र राष्ट्रांना जोरदार प्रत्युत्तर देण्यास तयार आहे. यावेळी खामेनी यांनी इस्रायलसोबत अमेरिकेचेही नाव घेतले आहे. खामेनी म्हणाले, ‘शत्रू इस्त्राईल असो वा अमेरिका, जो कोणी इराणवर वाईट नजर टाकेल त्यांना नक्कीच चोख प्रत्युत्तर मिळेल.’