Wriddhiman Saha : भारताचा अनुभवी यष्टीरक्षक फलंदाज रिद्धिमान साहा (Wriddhiman Saha) याने रणजी ट्रॉफीच्या चालू हंगामाटच क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली आहे. बंगालच्या या 40 वर्षीय यष्टीरक्षकाने 2010 मध्ये आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केल्यापासून आतापर्यंत 40 कसोटी आणि नऊ एकदिवसीय सामने खेळले आहेत. साहाने पहिला सामना आफ्रिकेविरुद्ध खेळला होता.
साहाने सोशल मीडियावर शेअर केलेल्या पोस्टमध्ये लिहिले की, ‘क्रिकेटमधील अप्रतिम प्रवासानंतर हा माझा शेवटचा हंगाम असेल. शेवटच्या वेळी बंगालचे प्रतिनिधित्व करणे आणि निवृत्तीपूर्वी फक्त रणजी ट्रॉफीमध्ये खेळणे हे माझ्यासाठी सन्मानाचे आहे. साहाने रविवारी रात्री उशिरा पोस्ट शेअर करत आपली निवृत्ती जाहीर केली आहे.
After a cherished journey in cricket, this season will be my last. I’m honored to represent Bengal one final time, playing only in the Ranji Trophy before I retire. Let’s make this season one to remember! pic.twitter.com/sGElgZuqfP
— Wriddhiman Saha (@Wriddhipops) November 3, 2024
गेल्या वर्षी केंद्रीय करार यादीतून वगळण्यापूर्वी साहा बराच काळ भारताच्या कसोटी संघाचा भाग होता. त्याला गेल्या वर्षी भारतीय क्रिकेट बोर्डाच्या केंद्रीय करार यादीतून वगळण्यात आले होते. न्यूझीलंडविरुद्ध खेळलेल्या संस्मरणीय खेळासाठी साहाला 2016 मध्ये सामनावीराचा पुरस्कार देण्यात आला होता. साहाने २०२१ मध्ये न्यूझीलंडविरुद्ध शेवटचा कसोटी सामना खेळला होता.
गेल्या महिन्याच्या 24 तारखेला 40 वर्षांचा झालेल्या साहाने रणजी ट्रॉफीमध्ये पदार्पण केले आणि बंगालचे प्रतिनिधित्व केले. यष्टीरक्षक फलंदाजाचा जन्म पश्चिम बंगालमधील शक्तीगढ येथे झाला. तो आयपीएलमध्ये चेन्नई सुपर किंग्ज, पंजाब किंग्ज, सनरायझर्स हैदराबाद, गुजरात टायटन्ससह होम स्टेट टीम कोलकाता नाइट रायडर्सकडून क्रिकेट खेळला आहे. त्याने आयपीएलमध्ये एकूण 170 सामने खेळले. त्याने 2014 मध्ये आयपीएलमध्ये पंजाब किंग्जकडून कोलकाता नाईट रायडर्सविरुद्ध आपले एकमेव शतक झळकावले होते. साहाने प्रथम श्रेणी पदार्पणाच्या सामन्यात हे शतक झळकावले होते, त्यानंतर तो निवडकर्त्यांच्या नजरेत आला होता. मात्र महेंद्र सिंग धोनीसमोर त्याला फारसे यश मिळवता आले नाही. दरम्यान, आता तो आयपीएलमध्ये खेळणार की नाही याबाबत कोणतीही माहिती देण्यात आलेली नाही.