India Canada Tensions : कॅनडात दिवसेंदिवस हिंदूंवर (India Canada Tensions) होणारे हल्ले वाढत चालले आहेत. काल ताज्या घटनेत ब्रॅम्प्टनमधील हिंदू सभा मंदिरावर खलिस्तान्यांनी हल्ला केला आहे. यावेळी अनेक हिंदू नागरिकांवर लाठ्या-काठ्यांनी मारहाण झाली आहे. मात्र, यानंतर कॅनडातील पोलिसांनी खलिस्तान्यांन ऐवजी भारतीय लोकांवरच कारवाई केल्याचे अनेक व्हिडिओ समोर आले आहेत.
दरम्यान, कॅनडाच्या पोलीस विभागातही खलिस्तानवाद्यांनी घुसखोरी केल्याचा आणखी एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. ब्रॅम्प्टनमधील हिंदू मंदिराजवळ काल घडलेल्या घटनेत तेथील एक पोलीस अधिकारी देखील सहभागी असल्याचे समजल्याने त्याला निलंबित करण्यात आले आहे.
कॅनेडियन पोलिस मीडिया अफेअर्स अधिकारी रिचर्ड चिन यांनी याबद्दल दिलेल्या माहितीनुसार, ‘सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या एका व्हिडिओमध्ये कॅनडातील एक पोलीस अधिकारी देखील आढळून आला आहे. जो कालच्या प्रकरणात खलिस्तान्यांच्या समर्थनार्थ दिसून आला आहे. मात्र, त्यावेळी पोलीस अधिकारी ड्युटीवर नसल्याचे रिचर्ड चिन यांनी सांगितले आहे. संबंधित अधिकाऱ्याला निलंबित करण्यात आल्याची माहिती देखील रिचर्ड चिन यांनी दिली आहे. दरम्यान, काल झालेल्या प्रकरणात कॅनडा पोलिसांनी तीन जणांना अटक केली आहे. त्यांच्यावर शस्त्राने हल्ला करण्याचा आरोप आहे.
Officers will be deployed to ensure peace & lawfulness at planned demonstrations. Violence & other criminal acts has no place in our community. pic.twitter.com/ebrLHCszQZ
— Peel Regional Police (@PeelPolice) November 4, 2024
काय म्हणाले पोलीस विभाग?
मीडिया अफेयर्स ऑफिसर रिचर्ड चिन यांनी सांगितले की, सोशल मीडियावर व्हायरल व्हिडिओमध्ये जे काही दिसत आहे त्याची चौकशी केली जात आहे. हा तपास पूर्ण होईपर्यंत जास्त माहिती देता येणार नाही. पुढे चिन म्हणाले की, हिंसाचार आणि इतर गुन्हेगारी कृत्यांना आपल्या समाजात स्थान नाही.’
https://twitter.com/narendramodi/status/1853442198575952031
पंतप्रधान मोदींनी कॅनडावर साधला निशाणा
दरम्यान, कॅनडातील मंदिरांवर आणि हिंदूंवर झालेल्या हल्ल्यांबाबत भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही कठोर विधान केले आहे. पंतप्रधान मोदींनी ट्विट करत कालच्या घटनेचा निषेध केला आहे. ‘कॅनडातील हिंदू मंदिरावर झालेल्या हल्ल्याचा मी तीव्र निषेध करतो हे भयानक आहे. अशा प्रकारच्या हिंसाचारामुळे भारताचा संकल्प कधीही कमकुवत होणार नाही. कॅनडा सरकारने न्याय सुनिश्चित करणे आणि कायद्याचे राज्य राखणे आम्हाला अपेक्षित आहे.’