Sharad Pawar : ‘मी सत्तेत नाही. मी राज्यसभेत आहे. अजून माझे दीड वर्ष बाकी आहे. दीड वर्षांनंतर राज्यसभेत जायचं की नाही याचा विचार मला करावा लागेल. लोकसभा मी लढणार नाही. कोणतीही निवडणूक लढणार नाही. किती निवडणुका करायच्या. आतापर्यंत 14 निवडणुका केल्या. तुम्ही एकदाही घरी पाठवलं नाही. दरवेळी निवडून देत आहात. त्यामुळे कुठे तरी थांबलं पाहिजे. नवी पिढी समोर आली पाहिजे हे सूत्र घेऊन मी कामाला लागलो आहे.’ असे वक्तव्य राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांनी केले आहे.
त्यांच्या या विधानानंतर शरद पवार हे लवकरच राजकारणातून निवृत्त होणार असल्याची चर्चा रंगली आहे. राज्यातील विधानसभा निवडणुका तोंडावर आल्या आल्याने सर्वच पक्ष कामाला लागले आहेत. सर्वच पक्षांकडून प्रचाराला सुरुवात करण्यात आली आहे. याच पार्श्वभूमीवर शरद पवार देखील बारामती विधानसभा मतदारसंघाचे मविआचे उमेदवार युगेंद्र यादव यांच्या प्रचारासाठी मैदानात उतरले आहेत. बारामतीत आयोजित प्रचार सभेत पवारांनी निवृत्तीचे संकेत दिले आहेत. तसेच यावेळी त्यांनी महाविकास आघाडीचा पाठिंबा युगेंद्र पवार यांना आहे, एक नवीन नेतृत्व आहे त्यांना साथ द्या असे वक्तव्यही त्यांनी केले आहे.
‘या’ तारखेला होणार मतदान
राज्यात 288 जागांसाठी एकाच टप्प्यात मतदान होणार असून, येत्या 20 नोव्हेंबरला महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकीसाठी मतदान पार पडणार आहे. तर 23 नोव्हेंबरला निकाल जाहीर होणार आहेत. निवडणुका आता तोंडावर आल्याने सर्व पक्ष प्रचाराच्या कामाला लागले आहेत. तसेच विविध ठिकाणी प्रचार सभांचे आयोजन केले जात आहे.