Winter Session of Parliament : संसदेचे हिवाळी अधिवेशन 25 नोव्हेंबरपासून सुरू होणार असून 20 डिसेंबरपर्यंत चालणार आहे. हिवाळी अधिवेशनाच्या कार्यक्रमाची माहिती संसदीय कामकाज मंत्री किरेन रिजिजू (Kiren Rijiju) यांनी दिली आहे. किरेन रिजिजू यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म X वर पोस्ट शेअर करत लिहिले, ‘संविधान स्वीकारल्याच्या 75 व्या वर्धापन दिनानिमित्त 26 नोव्हेंबर रोजी संसदेच्या सेंट्रल हॉलमध्येही संविधान दिन साजरा केला जाईल.’
अधिवेशनात 21 बैठका होणार
संसदेच्या हिवाळी अधिवेशनात 21 बैठका होणार आहेत. यामध्ये महत्त्वाची विधेयके मंजूर केली जाणार आहेत. संयुक्त संसदीय समितीच्या शिफारशींचा विचार करून अधिवेशनात वक्फ (दुरुस्ती) विधेयकावर चर्चा होऊ शकते. पूर्व लडाखमध्ये भारत आणि चीन यांच्यातील तणाव कमी करण्याच्या प्रयत्नांबाबतही सरकार संसदेला माहिती देऊ शकते.
Hon’ble President, on the recommendation of Government of India, has approved the proposal for summoning of both the Houses of Parliament for the Winter Session, 2024 from 25th November to 20th December, 2024 (subject to exigencies of parliamentary business). On 26th November,… pic.twitter.com/dV69uyvle6
— Kiren Rijiju (@KirenRijiju) November 5, 2024
महाराष्ट्र आणि झारखंड विधानसभा निवडणुकीचे निकाल जाहीर होणार
या वर्षाच्या सुरुवातीला झालेल्या लोकसभा निवडणुकीनंतर हे पहिले हिवाळी अधिवेशन आहे. या अधिवेशनात सत्ताधारी आणि विरोधक यांच्यात खडाजंगीही होऊ शकते. हरियाणा आणि जम्मू-काश्मीरच्या निवडणुकीनंतर हे हिवाळी अधिवेशन होत आहे. यासोबतच महाराष्ट्र आणि झारखंडच्या विधानसभा निवडणुकीचे निकालही तोपर्यंत येतील. या दोन राज्यांच्या निवडणूक निकालांचा संसदेच्या हिवाळी अधिवेशनावर लक्षणीय परिणाम होणार आहे.
दरम्यान, या हिवाळी अधिवेशनादरम्यान, मोदी सरकार’वन नेशन, वन इलेक्शन’ प्रस्ताव, वक्फ (दुरुस्ती) विधेयक, समान नागरी कायदा 2024 यांसारख्या विषयांवर चर्चा होण्याची शक्यता आहे.