2036 Olympics Games In India : 2036 मध्ये भारतात ऑलिम्पिक आणि पॅरालिम्पिक स्पर्धेचे (2036 Olympics Games In India) आयोजन करण्याचे पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांचे स्वप्न साकार करण्यासाठी भारतीय ऑलिम्पिक संघटनेने एक महत्वाचे पाऊल उचलले आहे.
भारतीय ऑलिम्पिक संघटनेने (IOA) प्रथमच या संदर्भात अधिकृतपणे एक पत्र पाठवले आहे. भारतीय ऑलिम्पिक संघटनेने आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक समितीला एक पत्र पाठवत ऑलिम्पिक स्पर्धेचे आयोजन करण्यात रस दाखवला आहे. पंतप्रधान मोदी यांनी देशाच्या क्रीडा भविष्यासाठी ऑलिम्पिक आणि पॅरालिम्पिकचे आयोजन करण्याची भारताची इच्छा सातत्याने व्यक्त केली आहे.
2036 मध्ये ऑलिम्पिक आणि पॅरालिम्पिक खेळांचे आयोजन करण्याच्या दिशेने पहिले मोठे पाऊल उचलत, भारताने 2036 मध्ये ऑलिम्पिक आणि पॅरालिम्पिक खेळांचे आयोजन करण्याची देशाची इच्छा व्यक्त करत आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक समिती (IOA) कडे इरादा पत्र सादर केले आहे.
क्रीडा मंत्रालयाच्या सूत्राने पीटीआयला दिलेल्या माहितीनुसार, भारतीय ऑलिम्पिक असोसिएशनने (IOA) हे पत्र 1 ऑक्टोबर रोजी IOC ला सादर केले होते. “ही महत्त्वाची संधी देशभरात आर्थिक वाढ, सामाजिक प्रगती आणि युवा सक्षमीकरणाला चालना देण्याच्या दिशेने एक महत्वाचे पाऊल असल्याचे सूत्राने सांगितले आहे.’
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गेल्या वर्षी पहिल्यांदा 2036 ऑलिम्पिकचे आयोजन भारतात करण्याची इच्छा व्यक्त केली होती. पुढील वर्षी होणाऱ्या IOC निवडणुकीपर्यंत यजमानपदाचा निर्णय घेतला जाणार नाही. ऑलिम्पिक स्पर्धेच्या यजमानपदासाठी प्रबळ दावेदार म्हणून स्वत:ला सादर करणाऱ्या सौदी अरेबिया, कतार आणि तुर्कस्तानसारख्या अनेक देशांसोबत भारताला खडतर स्पर्धेला तोंड द्यावे लागणार आहे.
इरादा पत्राचा अर्थ काय आहे?
इरादा पत्र सादर करण्याचा अर्थ असा आहे की, ऑलिम्पिकचे यजमानपद निवडण्याच्या प्रक्रियेत देश अनौपचारिक संवादातून औपचारिक संवादाच्या टप्प्यात गेला आहे. या टप्प्यात IOC संभाव्य यजमानांच्या खेळांशी संबंधित प्रकल्पांच्या प्रगतीचा व्यवहार्यता अभ्यास करते. यामध्ये वर्तणुकीचे मूल्यमापन मानवी हक्क, व्यवसाय सामाजिक जबाबदारी (बीएसआर) आणि इंटरनॅशनल युनियन फॉर कॉन्झर्व्हेशन ऑफ नेचर (IUCN) च्या विचारांसह अनेक घटक विचारात घेते.
आयओसीचे विद्यमान प्रमुख थॉमस बाक यांनी भारताला ऑलम्पिकच्या यजमानपदासाठी पाठिंबा दर्शवला आहे. भारताने यापूर्वी 2010 मध्ये राष्ट्रकुल स्पर्धेचे आयोजन केले होते. या खेळांचे आयोजन नवी दिल्लीत करण्यात आले होते परंतु अहमदाबादकडे ऑलिम्पिक 2026 चे यजमान शहर होण्यासाठी प्रबळ दावेदार म्हणून पाहिले जात आहे.