Eknath Shinde : राज्यात विधानसभा (Assembly Elections) निवडणुका तोंडावर आल्या असून, सर्वच पक्ष कामाला लागले आहेत. राज्यातील दोन मोठ्या आघाड्या आता प्रचाराच्या कामात व्यस्त आहेत. महायुती तसेच महाविकास आघाडीकडून राज्यात विविध भागात प्रचार सभेचे आयोजन केले जात आहे. राज्यात 20 नोव्हेंबर रोजी मतदान होणार असून, 23 नोव्हेंबर रोजी निवडणुकीचा निकाल लागणार आहे.
याच पार्श्वभूमीवर सध्या महायुती आणि महाविकास आघाडीसह सर्वच पक्षाच्या नेत्यांकडून जोरदार प्रचार सुरु आहे. महाराष्ट्रातील विविध मतदारसंघात सभा आणि मेळावे सुरु आहेत. तसेच सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये आरोप-प्रत्यारोप सुरु आहेत. यातच महायुतीची एकत्रित जाहीर सभा कोल्हापूरमध्ये पार पडली. या सभेत महायुतीकडून जाहीरनामा प्रसिद्ध करण्यात आला आहे.
कोल्हापुरात बोलताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी 10 मोठी आश्वासने दिली आहेत. यामध्ये लाडक्या बहिणींना 1 हजार 500 रुपयांवरून 2 हजार 100 रुपये, शेतकऱ्यांची कर्जमाफी, 25 हजार महिलांची पोलीस भरती अशी 10 मोठी आश्वासने दिली आहेत.
महायुतीकडून मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी केलेल्या दहा मोठ्या घोषणा :-
राज्यातील लाडक्या बहिणींना प्रतिमाही 2100 रुपये, पोलीस दलात 25 हजार महिलांची भरती.
शेतकऱ्यांना कर्जमाफी आणि शेतकरी सन्मान योजनेत 15 हजार रुपये.
वृद्ध पेन्शनधारकांना 2100 रुपयांची मदत.
जीवनावश्यक वस्तूंच्या किंमती स्थिर ठेवणार.
राज्यातील तरुणांना 25 लाख रोजगार देणार.
अंगणवाडी सेविका आणि आशा वर्कर्स यांना 15 हजार रुपये वेतन.
वीज बिलात 30 टक्के कपात.
शंभर दिवसात व्हिजन महाराष्ट्र 2029 सादर करणार.
प्रत्येकाला अन्न आणि निवाऱ्यांची हमी.
45 हजार पांदण रस्ते बांधणार.